माणगावच्या अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल; भावनाताई घाणेकर यांच्या पुढाकाराने आंदोलकांशी थेट संवाद

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 31/10/2026

माणगावच्या अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल; भावनाताई घाणेकर यांच्या पुढाकाराने आंदोलकांशी थेट संवाद


पत्रकार / पूजा चव्हाण.

माणगाव, दि. ३१ -रायगड जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख व शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करावीत आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, या प्रमुख मागण्यांसाठी माणगाव तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या जाहीर अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दखल घेतली आहे.




राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माणगाव तालुकाध्यक्ष श्री. राजू मोहन रोडेकर व विधानसभा अध्यक्ष श्री. संताजी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून आज चौथा दिवस आहे. शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.


काल या आंदोलनस्थळी उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा *मा. भावनाताई घाणेकर* यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माणगावचे तहसीलदार मा. विपिन लोकारे यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.


त्यानंतर भावनाताई घाणेकर यांनी खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या मागण्या व व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. भावनाताईंच्या पुढाकारातून सुप्रियाताईंनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मागण्या तातडीने जिल्हाधिकारी व राज्य शासनापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले.


शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपला ठाम पाठिंबा असून मागण्यांना न्याय मिळेपर्यंत या संघर्षात खंबीरपणे सोबत राहणार असल्याची भूमिका भावनाताई घाणेकर यांनी यावेळी मांडली.


भावनाताईंच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला असून आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top