हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 28/10/2026
*उरणमध्ये पाणी टंचाई असताना मोरा रोडवर पाणी वाया; बातमीनंतर दुरुस्ती सुरू.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या असताना उरण मोरा रोड बोरी पारा पुढे रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी वाहत असल्याची बातमी पत्रकार पूजा चव्हाण यांनी हिंदुसम्राट न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केली होती. रस्त्याखालील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर सतत पाणी येत होते आणि साचत होते, त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जाणे योग्य नाही अशी नागरिकांची मागणी होती. या बातमीची दखल घेत उरण नगरपालिका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे, त्यामुळे पाण्याची होणारी गळती थांबणार असून रस्त्यावरील अपघाताचा धोकाही टळणार आहे.


