उरणमध्ये पाणी टंचाई असताना मोरा रोडवर पाणी वाया; बोरी पाराजवळील रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीची मागणी.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 25/10/2026

उरणमध्ये पाणी टंचाई असताना मोरा रोडवर पाणी वाया; बोरी पाराजवळील रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीची मागणी.


पत्रकार / पूजा चव्हाण 

उरण  -उरण शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या असताना उरण मोरा रोड बोरी पारा पुढे रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्याखालील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली असून त्यातून रस्त्यावर पाणी येत आहे. सतत पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावर पाणी साचते आणि दुचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो.


नागरिकांचे म्हणणे आहे की एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जाणे योग्य नाही. याच परिसरात नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियमितपणे केली जाते, त्याचप्रमाणे या पाणी गळतीकडेही लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


प्रशासनाने या ठिकाणी पाहणी करून फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी जेणेकरून पाण्याची गळती थांबेल आणि रस्त्यावरील अपघाताचा धोका टळेल अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top