पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना 24 तासात अटक; उरण पोलिसांची मोठी कारवाई.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 24/10/2026

पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना 24 तासात अटक; उरण पोलिसांची मोठी कारवाई.


पत्रकार / पूजा चव्हाण 

उरण- जुन्या वादातून फिर्यादी यांना रस्त्यात अडवून लोखंडी हत्याराने डोक्यात 5 ते 7 वार करून अंगावर पेट्रोल टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना उरण पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 395/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 118(2), 126(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना आरोपी अष्टांग उर्फ सर्वेश हरेश्वर पाटील वय 28 रा. उरण आणि ऋतिक पांडुरंग चाळके वय 26 रा. शिरवणे नेरुळ यांनी बुलेटवरून येऊन त्यांना अडवले आणि "धर त्याला सोडू नको आज त्याला खलासच करायचंय" असे म्हणत खाली पाडून लोखंडी हत्याराने मारहाण करून सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्यानंतर आरोपींनी तपास लागू नये म्हणून आपल्या मोबाईल मधील सिमकार्ड काढून फेकून दिले होते आणि घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने गुन्हा उघडकीस येणे कठीण होते.


मात्र पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त दीपक साकोरे, अपर आयुक्त प्रमोद शेवाळे, उप आयुक्त अमित काळे यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक राहुल काटवानी यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे नवी मुंबई परिसरातून दोन्ही आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेतले असून त्यांना दि. 27/10/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून विनापुराव्याच्या अशा 5 मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदर कामगिरीत पोउपनि गोविंद केंद्रे, सपोनि भरत पाटील, सपोनि वैभव रोंगे, पोउपनि रोशन काथारा, पोहवा जयंत घरत, शशिकांत घरत, किशोर फंड, पोना अनिल मानकर, गंगाराम कचरे, पोशि रियाज शेख, बसवराज सकपाळ यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top