माथेरानच्या जंगलात बिबट्याचा वावर. पर्यटकांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 24/10/2026

*माथेरानच्या जंगलात बिबट्याचा वावर. पर्यटकांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण.



प्रतिनिधी ,चंद्रकांत काळे रायगड माथेरान.


जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रदूषण विरहित ओळख असणारे पर्यटन स्थळ माथेरान,

 मे महिना सन १८५० मध्ये ब्रिटिश अधिकारी आणि ठाण्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी व्युहु पॉइंट्झ. 

मॅलेट यांनी माथेरान चा शोध लावला. मॅलेट यांनी या माथेरान म्हणजेच माथ्यावरील रान म्हणजेच माथेरान डोगरदर्‍यांचे सौंदर्य पाहून त्याचा विकास करण्यास  सुरुवात केली. त्यानंतर मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन यांनी माथेरानला एक प्रमुख पर्यटक स्थळ म्हणून विकसित करण्यात मोठे योगदान दिले. माथेरान हे सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिम घाट माथ्यावर समुद्र सपाटीपासून सुमारे ८०३ मी, मीटर म्हणजेच २६२५ फूट उंचीवर वसलेले पर्यटक स्थळ आहे. भारतातील आकर्षक पर्यटक स्थळांपैकी माथेरानमध्ये एकमेव  टॉय ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी मिनी ट्रेन सन १९०७ मध्ये सर आदमजी 

पीरभॉय यांनी ऐतिहासिक नेरळ माथेरान टॉय ट्रेन सुरू केली . जी आजही पर्यटकांचे मुख्य वाहतुकीचे आकर्षण आहे ,गर्द झाडी या जंगलात अंजनी, कडू जांभळ, हिरडा, (औषधी वनस्पती) शिकेकाई, कुंभळ, तमालपत्र, कारवी, आणि विविध प्रकारच्या वेलींसह झाडांच्या सुमारे १५० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, येथील जंगल विविध जीवविविधतेने नटलेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात लाल व काळ्या रंगाच्या तोंडाची माकडे आढळतात. बिबट्या, भेकर, आणि शेकरू, आढळतात. तसेच कुंकू बुलबुल, मलबार विसलिंग क्रिश, यासारखे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. १४५ ऊन अधिक फुलांच्या प्रजाती या जंगलात पाहण्यास मिळतात. माथेरानच्या या जंगलामध्ये सध्या बिबट्याचा वावर सतत आढळत असल्याने माथेरान मोटार वाहनतळ  दस्तुरी या ठिकाणी वाहन चालकांना बिबट्या वारंवार नजरेत दिसत असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत असून माथेरान सेन सेन्सझेवियर हायस्कूल, व वन ट्री हिल परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत असून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण दिसून येत असून माथेरानच्या लाल मातीच्या कच्च्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस गर्द झाडी जंगल असल्याने तुर्ताच नव्याने शाळकरी विद्यार्थ्यांकरीता शाळेत जाणे व येण्यासाठी ईरिक्षा सुविधा वाहन उपलब्ध असले तरी प्रत्येक रिक्षामध्ये विद्यार्थ्यांचे एक पालक  त्यांच्यासह शाळेत सोडण्यासाठी जाणे व येणे यासाठी विद्यार्थ्यांसह सोबत असावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी रिक्षा संघटनेला केली आहे. बिबट्याच्या वारंवार दिसण्याचे व विद्यार्थी व नागरिक पर्यटक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण असले तरी माथेरानचा निसर्ग कायम हरित अबाधित राहावा याकरिता फॉरेस्ट अधिकारी व त्यांचे सहकारी समूह कामगार माथेरान नगराध्यक्ष मुख्याधिकारी पोलीस अधिकारी या प्रकारावर तीक्ष्ण दक्षता घेण्यात सज्ज आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top