करंजा गावात चार पिढ्यांची परंपरा कायम - ग्रामस्थ मंडळाचा कृष्ण जन्मोत्सव उत्साहात.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 4/9/2026

करंजा गावात चार पिढ्यांची परंपरा कायम - ग्रामस्थ मंडळाचा कृष्ण जन्मोत्सव उत्साहात.


पत्रकार / पूजा चव्हाण.

करंजा - उरण 

करंजा गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून करंजा गावची जवळपास चार पिढ्यांपासून अखंडपणे सुरू असलेली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.



या परंपरेत गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने आणि एकजुटीने सहभागी होतात. जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जुन्या पिढीने जपलेली ही अनमोल परंपरा आजची नवी पिढीही तितक्याच उत्साहाने आणि जबाबदारीने पुढे नेत आहे, हे विशेष.



ग्रामस्थ मंडळाच्या या उपक्रमामुळे गावात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मोठी मदत होत आहे. चार पिढ्यांपासून जपलेली ही परंपरा अशीच पुढील पिढ्यांपर्यंत अखंड सुरू राहावी, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top