हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 23/8/2026
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता महिला सापडली, मिसिंग केस दप्तरी दाखल.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण | 22 ऑगस्ट - उरण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या म.मि.रजि.नं. ५२/२०२६ मधील बेपत्ता महिला अखेर सापडली असून पोलिसांनी ही केस दप्तरी दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी खबर देणारे संतोष मधुकर पाटील, वय ३२ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. घर नं. ४७४, स्मशानभूमीच्या बाजूला, बोकडविरा, ता. उरण यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की त्यांची पत्नी सौ. संध्या संतोष पाटील, वय ४३ वर्षे या दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता सुमारास घरी कोणालाही काहीही न सांगता कुठेतरी निघून गेल्या आहेत.
या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर दाखल करून पोलिस हवालदार १९६ सचिन दत्तात्रय पाटील यांनी तांत्रिक मदतीच्या आधारे सदर महिलेचा शोध सुरू केला होता. शोध घेत असताना सदर महिला ही तिची मावशी सौ. भारती प्रकाश म्हात्रे, रा. वडगाव, ता. पेण, जि. रायगड येथे पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून राहण्यासाठी निघून गेल्याचे निष्पन्न झाले.
आज सदर महिला मिळून आल्याने तिला व खबर देणारे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात समक्ष हजर करण्यात आले असून त्यांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत. सदर बेपत्ता होण्याबाबत कोणाविरुद्धही काहीही संशय अगर तक्रार नसल्याचे त्यांनी जबाबात सांगितले आहे. त्यामुळे उरण पोलीस ठाणे मोठे म.मि.रजि.नं. ५२/२०२६ ही केस दप्तरी फाईल करण्यात आली आहे.


