हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 21/8/2026
तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे "CAMPUS CONNECT" अभियान - रील आणि पोस्टर स्पर्धेद्वारे जनजागृती.
पत्रकार / पूजा चव्हाण.
*नवी मुंबई*
शाळा-कॉलेजमधील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी *नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून "CAMPUS CONNECT - SAY NO TO DRUGS" हे विशेष जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबवले जाणारे हे अभियान विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना "व्यसनमुक्त समाजाचे राजदूत" बनवणे हा उद्देश ठेवते.
उरणमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवली
तसेच नवी मुंबई पोलिसांच्या "CAMPUS CONNECT - SAY NO TO DRUGS" अभियानांतर्गत उरण परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. यामध्ये उरण येथील *NAD केंद्रीय विद्यालय* सह सर्व शाळा-कॉलेजांचा समावेश होता.
या प्रशिक्षणात प्रोजेक्टरच्या माध्यमातून जनजागृतीपर पोस्टर आणि व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक आणि निरोगी जीवनशैली कशी जगता येईल याबत पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
व्यसनमुक्त आणि सुरक्षित शैक्षणिक परिसर घडवण्यासाठी उरणमधील विद्यार्थी-शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
*सर्जनशील स्पर्धांद्वारे संदेश*
या अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी आंतर-महाविद्यालय *रील बनवणे* आणि *पोस्टर बनवणे* स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
*पोस्टर स्पर्धा:*
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय, व्यसनाकडे नेणारा सहपाठींचा दबाव, पुनर्वसन, सकारात्मक जीवनशैली आणि व्यसनमुक्त शैक्षणिक संस्था यावर कलाकृती सादर करायच्या आहेत.
स्पर्धा `डिजिटल पोस्टर` आणि `हाताने काढलेले पोस्टर` अशा 2 गटात होणार आहे. पहिल्या बक्षीसासाठी *₹21,000*, दुसऱ्यासाठी *₹15,000* आणि तिसऱ्यासाठी *₹11,000* रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.
*रील स्पर्धा:*
30-60 सेकंदांचे व्हिडिओ बनवून व्यसन जागरूकता, सहपाठींचा दबाव, व्यसन प्रतिबंध, पुनर्वसन, सकारात्मक जीवन पर्याय, कुटुंबावर होणारा परिणाम आणि मदत मागण्याचे महत्त्व या विषयांवर रील बनवायच्या आहेत.
फिटनेस, कला, संगीत आणि शिक्षण हे व्यसनाला पर्याय म्हणून दाखवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. पहिल्या बक्षीसासाठी *₹51,000*, दुसऱ्यासाठी *₹31,000* आणि तिसऱ्यासाठी *₹21,000* बक्षीस ठेवण्यात आले आहे.
*कडक कारवाईसोबत जनजागृती*
नवी मुंबई पोलीस केवळ जागृतीच नाही तर कारवाईतही आघाडीवर आहेत.
2023 ते 2024 दरम्यान पोलिसांनी अमली पदार्थ सेवन आणि विक्रीचे *1,143 गुन्हे* नोंदवून *1,743 जणांना अटक* केली आणि *₹56 कोटी* किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच फेब्रुवारी 2025 मध्ये *₹10 कोटी* किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते.
4 ऑगस्ट 2026 रोजी ऐरोलीत "Drug-Free Educational Campus" मोहिमेअंतर्गत *₹41.60 लाख* किमतीचे हॅश ऑईल आणि हायड्रो गांजा जप्त करून एका संशयिताला अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहराच्या "शून्य सहनशीलता" धोरणावर भर देताना म्हटले आहे की, अमली पदार्थांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहिमा सातत्याने राबवल्या जात आहेत.


