नगराजशेठ सीबीएस ईइंटरनॅशनल स्कूल मध्ये नशामुक्त अभियान संपन्न अभ्यासाव्यतिरिक्त नशा करू लागलो तर आपली गती मंदावते : जगदीश शेलकर

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 4/8/2026

नगराजशेठ सीबीएस ईइंटरनॅशनल स्कूल मध्ये नशामुक्त अभियान संपन्न

अभ्यासाव्यतिरिक्त नशा करू लागलो तर आपली गती मंदावते : जगदीश शेलकर

( पत्रकार / पूजा चव्हाण )


देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यानी देशभरातव्यसन मुक्ती अभियान सुरु केले याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेद्र फडणवीस यांनी राज्यात नशा मुक्त अभियानाचा शुभारंभकेला आहे, हाच धागा पकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संपूर्ण नवीमुंबई परिसरात हे अभियान मोठया उत्साहात सुरु आहे.



उरण तालुकाही या बाबतीत एक पाउल पुढे असून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शेलकर साहेबांनी संपूर्ण उरण नशा मुक्त करण्या साठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व उपपोलीस आयुक्त रश्मी नांदेडकर. यांच्या मार्गदर्शनाखाली व बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या सौजन्माने उरण मधील शालेय विद्यार्थांमध्ये हि जागृती करण्या साठी नशा मुक्त अभियान सुरु केले असून त्याचा एक भाग म्हणून उरण मधील नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल मध्ये हे अभियान नगराजशेठ सीबीएस ईइंटरनॅशनल स्कूल व नागरी संरक्षण दल उरण-रायगड यांच्या संयुक्तविद्यमाने व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थांना संबोधितकरण्या साठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शेलकर साहेबउपस्थित होते यावेळी विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल ज्योती मॅडमव प्रशासीय अधिकारी प्रदीप पाटील सर यांनी त्यांचे स्वागत केले.


औपचारिक स्मृगता नंतरविद्यार्थ्यांना संबोधित करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदीश शेलकर साहे म्हणाले सर्व प्रथममीसर्वांचे स्वागत करतो आपण सारे विद्यार्थी आहात तेव्हां अभ्यासाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा स्मृताचा विकास सादावयाचा असल्यास आपल्या अभ्यासाची प्रगती साधणे आवश्यक आहे प्रगती साधावयाची असेल तर प्रगतीला शिस्त आणि गतिची जोड द्यावी लागते या स्कूलमध्ये समोर भव्य भितीवरील चित्र हे सारे सागून जाते निसर्ग आपले काम चोख बजावीत असतो येथे सूर्याच्याभोवती सूर्य मंडळत फिरणाऱ्या ग्रहांची चित्रे आहेत त्या पैकी आपण सारे पृथ्वीवर राहतो पण आपली पृथ्वी एका ठराविक कालमर्यादेत सूर्याच्या भोवती फिरत आहे, तच्या कालमर्यादेचा वे आजही कायम आहे हे चक्र जर बदले तर आपण या पृथीवर जिवंत राहू शकणार नाही तेव्हां निसर्गाकडून बरेच काही शिकण्या सारखे असते.

असे सांगून श्री. शेलकर साहेब पुढे म्हणाले तुमची प्रगती करायची असेल तर आपली गती योग्य असावी लागते पण आपण व्यसनाधीन झालो अभ्यासाव्यतिरिक्त नशा करू लागलो तर आपली गती मंदावते नशेचे व्यसन कुणी बाहेरून येऊन आपल्याला लावत नाही तर आपल्या जवळील मित्र, माणसे अपल्याला नशेचे व्यसन लावतात त्यांच्या पासून आपण सावधान राहिले पाहिजे आपल्या मित्रांना नशेच्या व्यसनमुक्त करायला पाहिजे आपल्या घरात वडील दारू पीत असतील तर त्मना त्मापासून मुक्त करयला हवे. कारण अमली पदार्थ, नशा आणणारे पदार्थ, ड्रग सिगारेट. तंबाखू अफू गांजा, दारू सारख्या नशा आणणाऱ्या पदार्थान पासून आपण दूर राहिले पाहिजे, आपल्या परिवाराला. शेजारी, मित्रयां आपण नशे पासून दूर राहण्या साठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे आपल्या बाबांना हेल्मेट घालण्याची सक्ती तुम्ही करायला हवी सावधगिरीने स्मृताचा प्रवास करावा वेगवेगळ्या नशेली पदार्थापासून सावध असावे.


त्याच प्रमाणे मोबाईलचा वापर कमी करावा. अलीकडे सायबरगुन्हेगार जाळे टाकून बसले आहेत तेव्हां माहिती नसलेला नंबरवर संपर्क करू नका. आपल्या सेवेत महाराष्ट्र पोलीस व नवी मुंबई पोलीस सदैव तत्प्रमर आहेत. यासाठी संकटकाळी तत्काळमदतीसाठी (112) हा एकाच नंबरआपण डायल करायचा आहे. मग तो पोलीस मदतीसाठी असो वैद्यकीय मदत, अग्निशमन सेवा, महिला सुरक्षा किंवा अपघातातील मदत असो आपल्या साठी पोलीस तत्प्रर आहेत. आजड्रग्ज्ञ नको शिक्षण हवे, ड्रग्ज्ञ घेण्य पेक्षा जीवन महत्वाचे आहे, कारण अमली पदार्थ, नशा आणणारे पदार्थ, ड्रग सिगारेट. तंबाखू अफू गांजा सारख्या नशा आणणाऱ्या पदार्थानपासून आपण दूर राहणेव आपल्या कुटुंबांतील सदस्य असो व आपले मित्र असो त्मान या नशे पासून दूर ठवले पाहिजे ही काळाची काळाची गरज आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्र संचलन अंकिता मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top