हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 3/8/2026
हणबर समाजातील कु. नेहा पटेकर हिची आयआयटी धारवाड येथे एम.टेकसाठी निवड.
आप्पाचीवाडी प्रतिनिधी उत्तम हेलाटे.
आप्पाचीवाडी येथील हणबर समाजातील कु.नेहा सदाशिव पटेकर हिने जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर GATE 2026 परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे पुढील शिक्षणासाठी तिची आयआयटी धारवाड येथे एम.टेक या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.सामान्य कुटुंबातील नेहाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळवले. तिच्या या यशामुळे आप्पाचीवाडी गावासह परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नेहाचे प्राथमिक शिक्षण मराठी मुलांची शाळा, आप्पाचीवाडी येथे,माध्यमिक शिक्षण कुरली येथे, तर बी.टेक.चे शिक्षण इचलकरंजी येथे झाले आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत,आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे तिने हे यश संपादन केले.
नेहाच्या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


