जी टी आय बंदराचे पाणजे गावात कॅन्सर तपासणी शिबिर संपन्नपरिसरातील शेकडो महिलांनी घेतला मोफत तपासणी शिबिराचा लाभ.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 28/7/2026

जी टी आय बंदराचे पाणजे गावात कॅन्सर तपासणी शिबिर संपन्नपरिसरातील शेकडो महिलांनी घेतला मोफत तपासणी शिबिराचा लाभ.




उरण(वार्ताहर) उरणच्या जे एन पी ए बंदरातील गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया म्हणजेच जी टी आय बंदराने आपल्या परिसरातील पाणजे गावात नुकतेच कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणी व्हॅन मध्ये या सर्व तपासणी करण्यात आल्या. जी टी आय बंदर आणि ओकहार्ट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या तपासणी शिबिराचा परिसरातील १०० पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला . यामध्ये स्तनांचा कॅन्सर , मुखाचा कॅन्सर, मान आणि गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर आदी प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. 


यावेळी बोलतांना जी टी आय चे वरिष्ठ अधिकारी यांनी आमची कंपनी नेहमीच स्थानिकांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न करीत आली आहे. त्याच उद्देशाने परिसरात कॅन्सर या भयंकर रोगाबाबत जागरूकता व्हावी आणि महिलांनी नियमित पणे आपली आरोग्याची तपासणी करावी कारण घरातील महिला सुदृढ असेल तर ते संपुर्ण कुटुंबच सुदृढ राहते त्यामुळेच महिलांच्या तपासणीला प्राधान्य दिल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच महिलांच्या आरोग्य तपासणीचा हा पहिलाच प्रयोग असून भविष्यात देखील या परिसरातील गावोगावी विविध प्रकारची शिबिरे भरविण्याचा मनोदय व्यक्त केला. 


यावेळी ओकहार्ट् च्या आरोग्य सेवकांनी कॅन्सर पासून कशाप्रकारे स्वतःचा बचाव करावा, कोणती खबरदारी घेतली जावी त्याचप्रमाणे नियमित जीवनात व्यायामाचे महत्त्व त्याचबरोबर शरीराची स्वच्छता आदी बाबत या निमित्ताने मार्गदर्शन केले. जी टी आय बंदराच्या माध्यमातून सातत्याने आरोग्य , शिक्षण , आणि परिसराच्या विकासाबाबत पुढाकार घेतला जातो त्याचप्रमाणे भविष्यात देखील अश्या प्रकारचे उपक्रम राबविले जाणार असल्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. या शिबिरात ३० महिलांची स्तनांच्या कॅन्सरची , १९ महिलांची  मान आणि गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सरची तपासणी आणि २५ महिलांची तोंडाच्या कॅन्सरची अत्यंत सूक्ष्म पद्धतीने तपासणी करण्यात आली. जी टी आय ने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पाणजे गावकऱ्यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top