JNPA च्या NSFT बर्थवर भीषण अपघात! जहाजातून ४ कंटेनर कोसळून बिहारच्या तरुणाचा मृत्यू, UP चा कामगार गंभीर जखमी - प्रशासनाच्या सुरक्षेला प्रश्नचिन्ह?

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 6/7/2026

 JNPA च्या NSFT बर्थवर भीषण अपघात! जहाजातून ४ कंटेनर कोसळून बिहारच्या तरुणाचा मृत्यू, UP चा कामगार गंभीर जखमी - प्रशासनाच्या सुरक्षेला प्रश्नचिन्ह?


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण,  : देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनलवर आज पहाटे भीषण अपघात झाला. शनिवार दि. 5 जुलै 2026 रोजी पहाटे 2.40 च्या सुमारास CB-01 बर्थवर उभ्या असलेल्या _MV Dalian_ या शिपिंग वेसलमधून लोडिंग- अनलोडिंग करताना ५ स्टॅक केलेल्या कंटेनरपैकी ४ कंटेनर एकदम कोसळले आणि ते थेट खाली स्लज ऑइल गोळा करत असलेल्या टँकरवर पडले. 



अपघात इतका भीषण होता की त्यात ONE शिपिंग लाईनसाठी कंत्राटी काम करणाऱ्या ऐका मजुरांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील जगदीशपूर तियारी येथील १९ वर्षीय अमित कुमार याचा जागीच मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील पहारपूरकला येथील ३० वर्षीय मोहम्मद नईम हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खारघरच्या मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृत अमितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालय, उरण येथे पाठवण्यात आला आहे.


प्राथमिक माहितीनुसार ऑपरेशन सुरू असतानाच अचानक जहाजावर जोरदार वाऱ्याचा झोत आला. ५ कंटेनर एकमेकांना लॅच आणि इंटरलॉक केलेले असल्याने त्यातील ४ कंटेनर एकाच युनिटप्रमाणे तुटून खाली कोसळले आणि ते खाली काम करणाऱ्या स्लज ऑइल टँकरवर आदळले. बंदरावर सुरक्षा नियमांची पायमल्ली आणि हवामानाचा अंदाज न घेता ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले का, असा सवाल आता कामगार संघटना आणि स्थानिकांकडून विचारला जात आहे.



"विकास आणि टनेजचे आकडे मोठे करायचे, पण बर्थवर काम करणाऱ्या मजुरांच्या जीवाची किंमत नेमी काय? रात्री-अपघाताच्या वेळी अतिरिक्त सुरक्षा पथके, वाऱ्याचा इशारा प्रणाली आणि क्रेन ऑपरेशनचे नियम काटेकोरपणे पाळले जात नाही या बाबत कामगार वर्गातून संताप व्यक्त आहे "  गेल्या वर्षीही JNPT मध्ये जहाजाची धडक आणि माल हाताळणीमध्ये दुर्घटना झाल्या होत्या, त्यानंतरही कोणत्याही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा कामगारांचा आरोप आहे.


दरम्यान बंदर प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले आहे? पण जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि टर्मिनल ऑपरेटरवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत JNPA मधील अपघात थांबणार नाहीत, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक कामगार देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top