उरण नगरपालिका कार्यालय चा मागे डंपिंग ग्राऊंड. नागरिकांचे आरोग्य धोक्यात,डेंगु ची प्रंचड साथ.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 21/7/2026

उरण नगरपालिका कार्यालय चा मागे  डंपिंग ग्राऊंड. नागरिकांचे आरोग्य धोक्यात,डेंगु ची प्रंचड साथ.


दि.२१ उरण (प्रविण पाटील)

उरण नगरपालिका कार्यालय चा  मागे उरण  नगर पालिकेने मोठया प्रमाणात डंपिंग ग्राउंड केले असुन हजारो टन कचरा जमा केला आहे.त्यामुळे रोगराई पसरली असुन  आजुबाजचा  सिध्दीविनायक सोसायटी ,मधुबन सोसायटी, दाजी कॉम्प्लेक्स, सोडे अपार्टमेंट,अशिर्वाद सोसायटी अशा अनेक सोसायटी मधील  नागरिक तापाने, खोकलाने ,डेंगुचा आजाराने त्रस्त आहेत. अनेकजण सरकारी ,खाजगी  रुग्णालयात उपचार घेत आहेत. 


सदर डंपिंग ग्राउंडला लागुन उरण शहराला पाणी पुरवठा करणारी पाणी  साठवण टाकी आहे.तर महावितरण ची डि.पी. आहे  तसेच मुख्य वैष्ठिय म्हणजे डंपिंग ग्राउंड ला लागुन विद्यमान आमदार चा बंगला आहे.



सदर डंपिंग ग्राउंड हटविण्यात यावे यासाठी दिनांक १३/७/२०२६ रोजी झालेला जनता दरबारात सर्व सोसायटीने निवेदन देण्यात आले आहे.तसेच वार्ड नंबर ९ मधील  स्थानिक नगरसेवकांना निर्देशित  केले असुन सुध्दा कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

सदर डंपिंग ग्राऊंड न हटविण्यात आल्याने सर्व सोसायटीतील नागरिकांन मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top