राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालक पदी अण्णासाहेब जोल्ले यांची बाजी.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 21/7/2026

राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालक पदी अण्णासाहेब जोल्ले यांची बाजी.


आप्पाचीवाडी प्रतिनिधी - उत्तम हेलाटे

देशातील सर्वोच्च सहकारी संस्था पैकी एक असलेल्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया एनसी यु आय नवी दिल्ली च्या संचालक मंडळावर चिक्कोडीचे माजी खासदार तसेच बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब जोले यांची निवड झाली तब्बल 35 वर्षाहून अधिक काळ त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला आहे त्यांचे अतूट कार्यक्षमतेवर देशभरातील सहकारी प्रतिनिधींनी विश्वास व्यक्त केला आहे

     देशात सहकार क्षेत्र अधिक सक्षम पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव आणि दूरदृष्टी असलेल्या अण्णासाहेब जले यांना मोठी संधी दिली आहे या निवडीमुळे भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

  या ऐतिहासिक विजया मागे केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शहा केंद्रीय राजमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय सरचिटणीस माननीय संतोष सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी संरक्षक श्री डी एन ठाकूर नाफेडचे संचालक श्री अशोक ठाकूर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top