हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 9/7/2026
वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम;सोपानदादा गव्हाडे पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
दै.हिंदूसंम्राट सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय काळे
सोयगाव:- गेल्या पंधरा वर्षांपासून सोयगाव तालुक्यात सातत्याने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे,गोरगरिबांचे कैवारी तसेच मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा प्रतिष्ठान सोयगाव मार्फत सोयगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्किटांचे वाटप करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
मा.सोपानदादा गव्हाडे पाटील यांनी समाजसेवेला आपले जीवन समर्पित केले असून, सोयगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला १,००० ते ५०० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. याशिवाय दरवर्षी जुलै महिन्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे,दुष्काळग्रस्त नागरिक आणि विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बिस्किट वाटप उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून,तो समाजोपयोगी कार्यातून साजरा व्हावा,
अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमास मेडिकल आफिसर डॉ.दिनानाथ खंदारे डॉ.शैलेश खंदारे,मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे,सोयगाव तालुकाध्यक्ष विजय चौधरी, पत्रकार सुलेमान शेख, शहराध्यक्ष अतुल चौधरी, सुरक्षारक्षक मगरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


