कुरलीच्या श्रीकांत शिंत्रेची जर्मनी दौऱ्यासाठी निवड; ७१ देशांतील स्पर्धेत मिळवले मानाचे स्थान

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 9/7/2026

कुरलीच्या श्रीकांत शिंत्रेची जर्मनी दौऱ्यासाठी निवड; ७१ देशांतील स्पर्धेत मिळवले मानाचे स्थान


अप्पाचीवाडी प्रतिनिधी उत्तम हेलाटे

 कुरली येथील श्रीकांत उर्फ वरद विजयकुमार शिंत्रे याची जर्मनीतील प्रतिष्ठित गोयथे इन्स्टिट्यूट आयोजित २० दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. जगभरातील ७१ देशांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच राज्यातून निवड झालेल्या केवळ सहा विद्यार्थ्यांमध्ये श्रीकांतने मानाचे स्थान मिळवले आहे.

श्रीकांत हा कुरली येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंत्रे यांचा चिरंजीव असून, तो सध्या बेळगाव येथील के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. इयत्ता सहावीपासून त्याने जर्मन भाषेचा अभ्यास सुरू केला असून, जर्मन भाषा अभ्यासक्रमातील स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत गोयथे इन्स्टिट्यूटने त्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे.

श्रीकांतने यापूर्वी एनएसटीएसई (NSTSE) आणि सिल्व्हर झोन ऑलिम्पियाड यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित परीक्षांमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच, २०२१ मध्ये चंदीगड येथे त्याला 'चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड-२०२१' प्रदान करण्यात आला होता. याशिवाय जगातील टॉप १०० बालगुणवंतांमध्ये त्याची निवड झाली आहे.

जर्मनीतील या अभ्यास दौऱ्यात श्रीकांतला जर्मन भाषा, संस्कृती, शिक्षण व्यवस्था तसेच विविध ऐतिहासिक आणि वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल श्रीकांतचे कुरलीसह संपूर्ण परिसरातून अभिनंदन होत असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top