द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 13/7/2026

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी.

पत्रकार पूजा चव्हाण 


उरण, 13  जुलै 2026: महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उरण पोलीस ठाणे हद्दीतील द्रोणागिरी येथील देवकृपा बिल्डिंगमध्ये असलेल्या "युनिक युनिसेक्स सलून" या दुकानात हेअर वॉशसाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12/07/2026 रोजी सकाळी 11.00 ते 11.30 च्या दरम्यान सदर महिला सलूनमध्ये हेअर वॉश करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे काम करणाऱ्या सोहेल शमशाद शेख, वय 21 वर्ष, राहणार द्रोणागिरी या इसमाने महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. 



या घटनेमुळे द्रोणागिरी आणि परिसरातील महिला वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. "युनिसेक्स" च्या नावाखाली महिला आणि पुरुष दोघांसाठी एकाच ठिकाणी सेवा देणे हेच मुळात धोकादायक आहे. अशा ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या अब्रूला धोका आहे. 


स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, महिलांसाठी स्वतंत्र केबिन, महिला कर्मचारी किंवा किमान CCTV सारख्या मूलभूत सुरक्षा व्यवस्था नसताना अशा सलूनना परवानगी कशी मिळते? पैशासाठी महिलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.


या प्रकरणानंतर उरण आणि द्रोणागिरीतील नागरिकांनी मागणी केली आहे की, "युनिक युनिसेक्स सलून" सारखी सर्व अनधिकृत आणि असुरक्षित सलून तात्काळ बंद करावीत. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व सलूनची तपासणी करून कठोर नियम लागू करावेत.


सध्या तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top