हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 13/7/2026
मतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी विशेष शिबिर; कामठा रोडवर 13 ते 18 जुलै दरम्यान SIR नोंदणी.
पत्रकार / पूजा चव्हाण.
कामठा, :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत आनंदनगर, करंजा रोड, कामगार वसाहत, कामठा, कामठा रोड आणि विमला तलाव परिसरातील सर्व मतदार बंधू-भगिनींसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मतदारांना EF फॉर्मचे वाटप आणि संकलन करण्यात येणार आहे. ज्यामुळे आपले नाव मतदार यादीत कायम राहील आणि मतदानाचा हक्क अबाधित राहील.
*शिबिराची माहिती:*
*दिनांक:* सोमवार 13/07/2026 ते शनिवार 18/07/2026
*वेळ:* सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
*ठिकाण:* हॉटेल राम रतन शामियाना, कामठा रोड
नगरसेवक राजेश उर्फ राजू मधुकर ठाकूर, नगरसेविका सायली म्हात्रे, दमयंती म्हात्रे
यांनी परिसरातील सर्व मतदारांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
"आपला मतदानाचा हक्क हीच आपली जबाबदारी आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणाचेही नाव यादीतून वगळले जाऊ नये यासाठी प्रत्येकाने हा फॉर्म भरून देणे आवश्यक आहे," असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तरी संबंधित परिसरातील सर्व नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून आपली नोंदणी पूर्ण करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.


