हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 26/7/2026
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्जचा निषेधार्थ उत्तर रायगड काँग्रेसचा उरणमध्ये कॅण्डल मार्च.
वार्ताहर / संयोग चव्हाण उरण
उरण, रायगड | 26 जुलै 2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज रविवार 26 जुलै 2026 रोजी उत्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उरण येथे भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. सायंकाळी 6.00 वाजता उरण येथील काँग्रेस कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. हातात मेणबत्त्या आणि फलक घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. "लोकशाहीचा आवाज दाबू नका", "विद्यार्थ्यांवर हल्ला बंद करा" अशा घोषणा देत हा मोर्चा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यात आला.
या निषेध मोर्चात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, पनवेल ग्रामीण अध्यक्ष नंदराज मुंगाजी, पेण तालुका अध्यक्ष संदीप परशुराम पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष देविदास म्हात्रे, कर्जत तालुका अध्यक्ष संजय गवळी, खोपोली शहर अध्यक्ष सागर जाधव आणि सुधागड तालुका अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह रायगड जिल्हा परिषद सदस्य अॅड. अविनाश ठाकुर, काँग्रेस नेते मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, माजी नगरसेवक बबन कांबळे, नंदाताई म्हात्रे, युवा नेते अमय पिल्ले, अश्वित थळी, देविदास थळी उरण शहराध्यक्ष गोपीराम तुंगेकर, अफशा मुकरी, सौ. निर्मला पाटील, सौ. चंदा मेवाणी यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI आणि सर्व सेलचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मनीष पाटील यांनी सांगितले की विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहे. त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आणि जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील. उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी सांगितले की उरणच्या तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या निषेधात सहभागी होऊन लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट दाखवली आहे. केंद्रातील सरकारला विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या भावनांची जाणीव करून देण्यासाठीच हा कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा गांधी पुतळ्याजवळ दोन मिनिटे शांतता पाळून दिल्लीतील आंदोलनातील ऐकवीस विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



