हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 23/7/2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी उरणमध्ये भव्य रक्तदान शिबीर.328 रक्तदात्यांनी दिले रक्त, 328 कुटुंबांना मिळाली नवसंजीवनी.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण :- आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा आणि समाजकार्यातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उरण, करंजा, जेएनपीटी आणि चिरनेर येथे एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उरण येथील तेरापंथी हॉल, करंजा, जेएनपीटी हॉल आणि चिरनेर या चार ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये उरण तेरापंथी हॉल येथे 119, करंजा येथे 65, जेएनपीटी हॉल येथे 64 आणि चिरनेर येथे 80 अशा एकूण 328 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदान हे एका कुटुंबासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. अशा प्रकारे 328 कुटुंबांना या उपक्रमातून मदतीचा हात मिळाला आहे.
सेवाभावी वृत्तीने पुढे येऊन रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे तसेच या उपक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतलेल्या आमदार महेश शेठ बालदी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा रक्तदान उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते.




