सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला धर्माबादकरांचा पाठिंबा; तहसीलदारांना निवेदन.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 17/7/2026

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला धर्माबादकरांचा पाठिंबा; तहसीलदारांना निवेदन.


दै हिंदूसम्राट धर्माबाद तालुका प्रतिनिधी लालाजी इमनेलू

धर्माबाद :- NEET परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला  धर्माबादमधील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. यानिमित्ताने धर्माबादचे तहसीलदार  यांना निवेदन देऊन सोनम वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.


निवेदनात शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंतीही करण्यात आली. या निवेदनावर साजीत करखेलीकर, असलम खान, किरण सोनकांबळे, नवीद अहमद, श्रीदास वाघमारे आणि भगवान कांबळे यांच्या सह्या असून, त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला. यावेळी उपस्थितांनी आंदोलनाच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top