पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते ‘भक्ती का महासागर’ ग्रंथाचे प्रकाशन; विराग मधुमालती यांच्या ९व्या विश्वविक्रमाचा गौरव.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 3/7/2026

पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते ‘भक्ती का महासागर’ ग्रंथाचे प्रकाशन; विराग मधुमालती यांच्या ९व्या विश्वविक्रमाचा गौरव.



नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): प्रख्यात गायक, कलाकार, लेखक, दिग्दर्शक, समाजसेवक आणि अनेक वर्ल्ड रेकॉर्डस धारक विराग मधुमालती यांच्या ‘भक्ती का महासागर’ या अद्वितीय ग्रंथाचे प्रकाशन आज शिकारा हॉटेल, सानपाडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. भगवान भैरवांवरील १,१०७ मौलिक भक्तिगीतांचा समावेश असलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन भारताचे सुप्रसिद्ध भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा व  

श्री. मेघराज राजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. सौ वंदना वानखडे,

 श्री. मोतीलाल जी जैन, श्री. अर्जुन जी सिंघवी माजी नवी मुंबई एज्युकेशन चेअरमन, आणि श्री. निलेश सोमाणी  यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


अवघ्या एका वर्षात भगवान भैरवांवरील १,१०७ मौलिक भक्तिगीते लिहिल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने त्यांच्या कार्याची “एका वर्षात सर्वाधिक गीते लिहिण्याचा” विश्वविक्रम म्हणून नोंद घेतली असून, हा त्यांचा ९वा विश्वविक्रम ठरला आहे.


यावेळी पद्मश्री अनुप जलोटा म्हणाले, “विराग मधुमालती यांनी भगवान भैरवांवरील १,१०७ भक्तिगीते लिहून भक्ती, श्रद्धा आणि साहित्य क्षेत्रात अद्वितीय कार्य केले आहे. ‘भक्ती का महासागर’ हा ग्रंथ भाविकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”


श्री. मेघराज राजे भोसले म्हणाले, “विराग मधुमालती यांचा हा विश्वविक्रम संपूर्ण भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे. कला, भक्ती आणि लेखनाच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.”


तसेच शिकारा ग्रुपचे श्री. अशोक मेहरा यांनी या कार्याला शुभेच्छा देत, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी आपले सहकार्य सदैव राहील, असे सांगितले.


विराग मधुमालती यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा ग्रंथ माझ्यासाठी केवळ पुस्तक नाही, तर भगवान भैरवांच्या चरणी अर्पण केलेली भक्ती आहे. हा सन्मान माझा नसून प्रत्येक भक्ताचा आहे, ज्यांच्या श्रद्धेने मला ही साधना पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.”


कार्यक्रमादरम्यान माध्यम प्रतिनिधींनी विराग मधुमालती यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी आणि या ऐतिहासिक विश्वविक्रमामागील संकल्पनेविषयी माहिती जाणून घेतली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top