हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 29/6/2026
लाल ब्रिगेट संघटनेच्या पुढाकाराने द्रोणागिरी मंदिर करंजा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न; २५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण:- लाल ब्रिगेट संघटना, उरण तालुका यांच्या आयोजनाखाली आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या सहकार्याने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी द्रोणागिरी मंदिर करंजा येथे भव्य मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. शिबिरात शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली असून गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या २५ लाभार्थ्यांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
या सर्व रुग्णांना हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशनसाठी पाठविण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. सभापती ॲड. सागर स. कडू, मा. उप सभापती सौ. वैशाली पाटील, श्री. निलेश पाटील (सामाजिक कार्यकर्ते), श्री. कल्पेश थळी (करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष), श्री. ऋतिक पाटील (अध्यक्ष, लाल ब्रिगेट संघटना, उरण तालुका), श्री. मुकेश थळी (उपाध्यक्ष, उरण तालुका पोरोगामी युवक संघटना), श्री. आकाश जोशी (अध्यक्ष, लाल ब्रिगेट संघटना, चाणजे), श्री. गजानन गांधी (शेतकरी पक्ष कार्यकर्ते), श्री. मनोहर थळी (सामाजिक कार्यकर्ते), श्री. नीलकमळ थळी (सामाजिक कार्यकर्ते) तसेच श्री. संजय म्हात्रे (पोलीस निरीक्षक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले आणि नागरिकांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. आयोजकांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.



