संस्था, शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, श्री. संतोष नाईक.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 24/6/2026

संस्था, शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, श्री. संतोष नाईक. 


 
मिरज :- हिंदुसम्राट प्रतिनिधी संजय पवार 

भूड सिद्धनाथ विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्र बाळासो काळे सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष तुकाराम नाईक सर, सचिव सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी आपल्या मनोगतात शैक्षणिक प्रणालीमध्ये संस्था ,शाळा टिकवण्यासाठी सर्व शैक्षणिक घटकांनी जीव लावून आणि एकजुटीने, संघटितपणे काम करणे महत्त्वाचे आहे तसेच येणाऱ्या प्रत्येक समस्येवर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो यासाठी आपली सर्वांची एकजूट अभेद्य असणे महत्त्वाचे आहे, आज ग्रामीण भागामध्ये शाळा चालवत असताना संस्थापकांना सुद्धा कसरत करावी लागते एक तर कॉन्व्हेंट स्कूलची स्पर्धा आणि   सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असतो हा विचार सर्वांनी लक्षात ठेवून काम करावे तसेच श्री. काळे सरांना सेवानिवृत्तीच्या आणि बाहेर वाटचालीस मनःपूर्वक मनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कै. सौ.वेणूताई यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील उर्फ राजन कृष्णराव पवार यांनी आपले अध्यक्षीय मनोगतामध्ये काळे सरांच्या भावी आयुष्याबद्दल संस्थेच्या वतीने मनःपूर्वक मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन संस्थेचे संपूर्ण माहिती सांगून भविष्य काळामध्ये आणखी आपणास काय उद्दिष्ट साध्य करणे महत्त्वाचे आहे ते सांगून माझ्या सर्व प्रामाणिक आणि होतकरू कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळेच संस्थेची विद्यालयाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे असा विश्वास संपादन केला. 

 तसेच यावेळी भूड गावचे  सरपंच श्री संतोष कदम ,पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ. पायलताई कदम, खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री विश्वनाथ काटकर, केंद्रप्रमुख श्री सानप सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तम कदम, मातोश्री वेणुताई चव्हाण माध्यमिक व डॉक्टर के आर पवार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत चव्हाण सर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top