हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 24/6/2026
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे.,,अध्यक्ष नरहरी काळे.
नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नरहरी काळे तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू पावशे बिनविरोध निवड.
नीरा नरसिंहपूर : प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नरहरी जगन्नाथ काळे तर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अर्जुन पावशे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार निबंधक शिवरकर यांनी काम पाहिले. नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडी प्रसंगी अध्यक्ष नरहरी काळे बोलत असताना म्हणाले की लक्ष्मी नरसिंह देवस्थानचा आशीर्वाद व सर्व ग्रामस्थ आणि सभासदांची साथ पाठीशी असल्या मुळेच मी आज अध्यक्ष झालो याचा मला अभिमान आहे. विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदाला कोणतीही आडचन येऊ देणार नाही. निवडी प्रसंगी अध्यक्ष नरहरी काळे यांचे उद्गार,,
नरसिंहपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक म्हणून आनंद चंद्रकांत काकडे, संतोष शिवाजी मोरे, गणेश सतीश जगदाळे, प्रदीप नानासाहेब जगदाळे, अनिता राजकुमार भोसले, नामदेव तुकाराम सरवदे, शिरीष कुमार गुलाबराव निंबाळकर, अभिजीत बुवासाहेब मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सहाय्यक सचिव म्हणून संजय दत्तात्रेय दुनाखे यांनी काम पाहिले.


