शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 4/6/2026

मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी वृद्धाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन...


वाडा/डॉ.दिपेश पष्टे

कुडूस (ता. वाडा) येथे फेब्रुवारी महिन्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी वाडा पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वाडा पोलिस ठाण्यात दाखल अपघात मृत्यू रजिस्टर क्र. १६/२०२६ नुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडूस येथील मच्छी सेंटर दुकानाजवळ एक अनोळखी वृद्ध व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली होती. सदर व्यक्ती परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली होती. प्राथमिक माहितीनुसार, कोणत्यातरी शारीरिक आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६० ते ७० वर्षे असून, अंगकाठी बारीक, रंग सावळा, केस व दाढी पांढऱ्या रंगाची होती. मृत्यूच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, भगव्या रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचा पंचा परिधान केला होता.

घटनेला चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे नातेवाईक अथवा ओळखीचे नागरिक पुढे यावेत, असे आवाहन वाडा पोलिसांनी केले आहे.

सदर वृद्ध व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती असल्यास किंवा छायाचित्र पाहून ओळख पटत असल्यास तात्काळ वाडा पोलिस ठाणे अथवा तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

संपर्क : वाडा पोलिस ठाणे – ८६६९६०४०६४

तपास अधिकारी : सपोनि. भगवंत चौधरी – ९९२२०९५७८१ नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून संबंधित नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन वाडा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top