उरणच्या स्वातंत्र्यवीर क्रीडामैदानात पोलिसांचा छापा; 2.56 लाखांचे हेरॉईन जप्त, करंजा येथील तरुणाला अटक .

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 19/6/2026

उरणच्या स्वातंत्र्यवीर क्रीडामैदानात पोलिसांचा छापा; 

 2.56 लाखांचे हेरॉईन जप्त, करंजा येथील तरुणाला अटक.




 पत्रकार / पूजा चव्हाण 

उरण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी, 17 जून रोजी सायंकाळी 4:29 वाजता स्वातंत्र्यवीर क्रीडामैदान (लाल मैदान) परिसरात टाकलेल्या छाप्यात धडक कारवाई करीत सुमारे 2 लाख 56 हजार रुपये किमतीचे 6.40 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे,सादर  प्रकरणी करंजा-चाणजे येथील रहिवासी मोहम्मद हुसैन अक्रम शेख वय 33 वर्षे   याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई अरूण धोंडीराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क) व 21(ब) अन्वये उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 199/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचे तीव्र प्रतिसाद परिसरात उमटले असून गेल्या काही महिन्यात उरण परिसरात अशाप्रकारचे गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अमली पदार्थ,तर अन्न व औषध प्रशासन आणी उरण  पोलिसाच्या सयुक्तपणे केलेल्या धाडसत्रात गुटका व अन्य माल एका टपरी मधून मोठया टपरी मधून सापडल्याची घटना ताजी आहे.अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या असल्याने  विशेषतः तरुणाईचे भविष्य धोक्यात आले आहे. 

       पोलीस अधिकृत सूत्राकडून देण्यात आलेल्या  माहिती नूसार ,गोपनीय मिळालेल्या  माहिती प्रमाणे व पोलीस शिपाई अरूण धोंडीराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी,व गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल काट यांनी  सपोनि संजय राठोड यांच्या पथकाने स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान (लालमैदान) परिसरात सापळा रचून मोहम्मद हुसैन अक्रम शेख वय 33 वर्षे या  संशयिताला ताब्यात घेतले आहे,तपासांती आरोपीच्या जवळ फिकट तपकिरी रंगाची 6.40 ग्रॅम वजनाची हेरॉईन पावडर सापडली असून   आंतरराष्ट्रीय बाजारात या पावडरची प्रति ग्रॅम 40,000 रुपये किमत आहे. त्यामुळे सापडलेल्या 6.40 ग्रॅमची हेरॉईनची  एकूण किंमत 2,56.000 रुपये इतकी आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन व आय-बाईक पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत त्यानंतर रात्रो 10:52 वाजता या गुन्ह्याची नोंद उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 199/2026 नुसार करण्यात आली आहे.याबाबत आरोपीला अटकेची कारणे लेखी स्वरूपात कळवण्यात आली आहेत.   

       या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सपोनि संजय राठोड करीत असून जप्त केलेले हेरॉईन आरोपीने कोठून आणले व तो कोणाला विक्री करणार होता याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. उरण परिसरात वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे असे पोलिसांचे म्हणणे असले तरी अमली  उरण परिसरात अमलीपदार्थकसे दाखल होतात पदार्थ कोठून आणले जातातव या मागचा सूत्रधार कोण   हे आजही गुलदस्त्यातच आहे. मात्र हासरा प्रकार रेल्वे सुरु झाल्या पासून वाढला असल्याची चर्चा नागरिकात दबक्या आवाजात सुरु आहे गांजा सर्वसाधारण पणे महाराष्ट्र आंध्रप्रदेश सीमेवर्ती भागात,हिमाचल प्रदेश,केरळ-तामिळनाडू, ओरिसा  मोठया प्रमाणात पिकविला जातो.राज्यातून अनेक ट्रेलर चालक जेएनपीए परिसरात कार्यरत आहेत मात्र असे असुन्ही या अमली पदार्थांची आवक या काही महिन्यात मोठया प्रमाणात झाली आहे. ही आवक रेल्वे मार्गावरूनच मोठया प्रमाणात होते,मात्र प्रवासी रेल्वे पेक्षा मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे  मार्गाने या अमली पदार्थांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असावी असा नागरिकाचा दबक्या आवाजातील सूर आहे.मात्र नागरिकांनी आता थेट अशा प्रकारची माहिती तात्काळ उरण पोलीस ठाण्याला कळवावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top