शेतकरी कुटुंबातील कन्येची यशोगाथा; आपाचीवाडीची दिव्या खोत बनली वकील.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 19/6/2026

शेतकरी कुटुंबातील कन्येची यशोगाथा; आपाचीवाडीची दिव्या खोत बनली वकील.


आपाचीवाडी प्रतिनीधी - उत्तम हेलाटे 

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सामान्य शेतकरी कुटुंबातील कन्येने वकिलीचे स्वप्न साकार केले आहे. आपाचीवाडी येथील कु. दिव्या विक्रम खोत हिने कायद्याचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून वकील होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिव्या ही एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिच्या घरात यापूर्वी कोणीही उच्चशिक्षित नव्हते. वडील आणि चुलते शेती व्यवसाय करत असून भावंडेही लहान आहेत. अशा परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत तिने शिक्षणाचा ध्यास घेतला आणि यशाचा टप्पा गाठला.

दहावीत शिक्षण घेत असताना तिच्या आत्याने "दिव्या, तू वकील झाली पाहिजेस" असे सांगितलेले शब्द तिच्या मनात कायमचे कोरले गेले. त्याच प्रेरणेतून तिने वकिलीचे स्वप्न उराशी बाळगले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली.

दिव्याने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली येथे पूर्ण केले. त्यानंतर पदवी शिक्षण देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे घेतले. पुढे शहाजी लॉ कॉलेज येथून एलएलबी (LL.B.) आणि डिप्लोमा इन लेबर लॉ हे अभ्यासक्रम पूर्ण केले. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एडीआर हा विशेष अभ्यासक्रमही यशस्वीरित्या पूर्ण केला.

सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर दिव्याने हे यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना दिव्या म्हणाली, "आजही अनेक गोरगरीब नागरिकांना वेळेत न्याय मिळत नाही. अशा वंचित आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार असून समाजासाठी काम करणे हेच माझे ध्येय आहे."

दिव्याच्या या यशामागे आई-वडील, चुलता-चुलती यांचे मोलाचे सहकार्य आणि आशीर्वाद लाभले. तसेच ॲड. एस. के. पोटले आणि ॲड. वैराट सर यांचे मार्गदर्शनही तिला लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top