हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 5/6/2026
सरपंचांना प्रशासक म्हणून दिला मोठा मान परंतु निधी खर्च न करण्यासाठी मोठा दिला ताण सरपंच प्रशासकाला 15 वीत आयोगाचा.
प्रतिनिधी हदगाव भगवान कदम
निधी खर्च करण्यासाठी परवानगी द्या मुख्यमंत्री यांना गट विकास अधिकारी यांच्या मार्फत हादगाव तालुका सरपंच संघटनेचे. निवेदन हदगाव तालुका प्रतिनिधी कैलास तलवारे. फेब्रुवारी 2026 पासून सरपंच यांना प्रशासक म्हणून राज्य शासनाने नेमणूक केली परंतु सर्वोच्च न्यायालयाने सरपंच प्रशासकाला पंधरावीत आयोग असो महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विविध फंडातून निधी खर्च करण्यास ब्रेक लावला असून सरपंचाला प्रशासक म्हणून मोठा मान व काम न करण्यासाठी मोठा ताण अशा प्रकारे सरपंच प्रशासकाची परिस्थिती दिसून येत आहे उन्हाळ्याचे दिवस असून पाणीटंचाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे परंतु काम न करण्याचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने लावल्यामुळे निधी खर्च करता येत नसून गावोगावी सरपंचांना डोकेदुखी होत आहे जवळपास तीन महिने होऊन गेले असून सरपंचांना प्रशासक म्हणून रुजू केले परंतु आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय तारीख फे तारीख देत आले आहे ग्रामविकास विभागाने सुद्धा सरपंच प्रशासकाची दखल घ्यावी व पूर्वीसारखे सुरळीत काम करण्यास आदेश द्यावेत या महिन्याच्या अंतिम निर्णय 22 जूनला आहे असेही तालुक्यातील सरपंच प्रशासकाकडून ऐकायला मिळत आहे सरपंचांनाच प्रशासक म्हणून ठेवून निधी खर्च करण्यासाठी आदेश देतील किंवा राज्य शासनाला निवडणुका घ्या असे आदेश देतील अथवा गटविकास अधिकारी यांना खर्च करण्याचे आदेश देतील किंवा राज्यपालाच्या आदेश द्वारे राज्यात बदल करून सरपंच प्रशासक पदाचा वेदता देतील का?
याकडे राज्यातील सर्व सरपंच प्रशासकाचे लक्ष लागले आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता बिनाकामाविषयी सरपंचाची कोंडी होत असून याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सरपंच प्रशासक त्याच्या विविध मागण्या व समस्या कडे लक्ष घालावे अशा प्रकारचे निवेदन हदगाव गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल पाटील सरपंच रुई धा , तालुका उपाध्यक्ष शितल गजानन कंठाळे सरपंच येवली, सचिव खंडू ठोके सरपंच वाळकी, सरपंच प्रतिनिधी कैलास तलवारे कोथळा, सरपंच प्रतिनिधी अमरदीप दवणे गुरफळी, सरपंच मल्हारी सोळंके हस्तरा, आधी सरपंच प्रशासक निवेदन देण्यास उपस्थित होते


