लोकशाही ची हुकूमशाही कडे वाटचाल करणाऱ्यावर काॅक्रोच जनता पार्टी चा वाढता दबाव.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 5/6/2026

 लोकशाही ची हुकूमशाही कडे वाटचाल करणाऱ्यावर काॅक्रोच जनता पार्टी चा वाढता दबाव.



हिंदूसम्राट प्रतिनिधी यशवंत चव्हाण यांजकडून) 

इजा बिजा तिजा" हि अतिशय जुनी म्हण आहे. ती आता काळानुरुप देशातला प्रत्येक नागरिक त्याचे  अनुभव घेत आहेत."इजा" म्हणजे २०१४ पर्यंत काँग्रेस चे सरकार ? छे छे राज्य  होते त्या काळात काँग्रेस देश कुरतडत होते."बिजा' म्हणजे २०१४ नंतर भाजप " अच्छे दिन"  चे स्वप्न दाखवत कुरतडणाऱ्या काँग्रेसवर मात करून देशाचे लचके कसे तोडायचे याचे प्रयोग सुरु केले. म्हणजे "काँग्रेस शेर है तो हम बब्बर शेर है"ह्याची प्रचिती देशाला दाखवली. जगभरात देशाची नाचक्की करून वाटोळे करण्यात काँग्रेस च्या दहा पाऊले आम्ही पुढे आहोत ह्याचे प्रात्यक्षिक मोदी सरकारचे बेधडकपणे कोणालाही न जुमानता करत आहेत."तिजा"  म्हणजे  ह्या भारत भूमीवर अतिशयोक्तीचा कडेलोट होतो, तेव्हा "*जयप्रकाश नारायण, अण्णा हजारे*" सारख्या विभूती देशाचे रक्षण करण्यास,उगम पावतात. गेल्या बारा वर्षात  भाजप पक्षाने देशाची जी वाताहत केली त्याला तोड नही. देश तीस वर्षे मागे नेला. भाजप ची ध्येय धोरणे हि पक्ष आणि ठराविक उद्योगपतीसाठीच राबिवली गेली. त्याची प्रचिती देशातला प्रत्येक नागरिक तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहे."*अति तेथे माती*" होते ह्या म्हणी नुसार अति वर मात करण्यासाठी *कॉक्रोच जनता पार्टी* चा उदय झाला. दबलेल्या हुंदक्याला वाट करून देण्यासाठी  त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हे देशासाठी एक सकारात्मक पाऊल आहे असे म्हणायला हरकत नाही.

                                     *अभिजित दिपके* ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद, त्यात त्याचे स्वच्छ सडेतोड विचार,त्यामागची त्याची भूमिका पाहून त्याने कोणत्याही राजकीय पक्षाला न दुखावता चार हात लांबच ठेवले. "*सोनम वांगचुक*","*खान सर*" सारख्या कोहिनुर हिऱ्यानी सुद्धा दीपिकेला समर्थन दिले हि फार मोठी सामाजिक क्रांती आहे. मोदी सरकारने देशाची कशी वाताहत केली, ह्याची बेधकडपणे जाहीर वाच्यता करणारे महाराष्ट्राचा विचार करता, राजकीय विश्लेषक,समाज सेवक पत्रकार जसे कि,*निरंजन टकले*,*असीम सरोदे*,*निखिल वागळे* *विश्वंभर चौधरी*,*अंजली दमानिया*राजू परुळेकर*,*राहुल कुलकर्णी*,*अभिजित कारंडे*,*प्रशांत कदम*,*नम्रता वागळे*,*कविता राणे*,*अनुजा धाक्रस*जाधव सर,व असे अनेक स्वच्छ चरित्र  चारित्र्य,विचारवंत,

भ्रष्टाचारावर प्रहार करणारे,लोकप्रतिनिधींना सडेतोड प्रश्न विचारणारे,व आपले रोखठोक विचार मांडून जनतेचा कौल घेत राहिले. पण प्रत्यक्षात विरोध करण्यासाठी मैदानात उतरले नाहीत. ती संधी आता कॉक्रोचेच्या निमित्ताने मिळाली आहे त्याचे त्यांनी सोने करावे. तसेच सध्यातरी महाराष्ट्रात,देशात सनदी अधिकारी *मान. तुकाराम मुंढे* साहेब व जनतेने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले पाहिजेत.सूडबुद्धीने का होईना मुंढे यांची वीस वर्षात पंचवीस वेळा बदल्या करून सरकार किती हीन दर्जाचे आहे हे जनतेला समजले. त्यातच ज्यांच्या बदल्या होत नाहीत त्यातील अनेक नोकरी ऐके नोकरी करणारे सांगकामे असावेत,भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींना मलिदा कसा ओरबाडायचा ह्याचे मार्गदर्शन करून त्यात त्यांचे टक्केवारी किती हे ठरलेले असावे. मुंढे साहेब याना जवळपास सर्वच खात्याचा अनुभव मिळाला. त्यातील भ्रष्टाचार निपटून काढणे,कार्यालयीन शिस्त ह्या गोष्टीना प्राधान्य मिळाले. भ्रष्टाचार निपटून काढण्याकरिता व सामाजिक क्रांतीचा विचार करता देशात सत्ता बदल होणे गरजेचे आहे. मान.मुंढे साहेबानी सरकारने केलेल्या मानहानीला तिलांजली देऊन सक्रिय राजकरणात उतरून महाराष्ट्राचे नेतृत्व करावे. त्यासाठीं वरील सर्व नामांकित विचारवंतांनी व जनतेने सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहून सरकार स्थापन करण्यासाठी प्रेमळ दबावतंत्र राबवावे..शाहू,फुले,आंबेडकर,शिवरायांच्या देशातून बजबजपुरी केलेल्या मुघलशाहीला नेस्तनाबुत करणे हि काळाची गरज आहे....  यशवंत चव्हाण सीबीडी बेलापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top