हिंदुसम्राट न्यूज
विद्यमान सुरनीस अनाजीपंतांनी जाहिर माफी मागावी.
(हिंदू सम्राट प्रतिनिधी यशवंत चव्हाण सीबीडी बेलापूर यांजकडून* )
छत्रपती शिवरायांच्या काळात नुरणीस अनाजी पंत ह्यांनी आपल्या कृतघ्न,कुटील,कावेबाज राजकीय वृत्तीने छत्रपती संभाजीराजे ह्यांना बदनाम करून त्यांची संभाजी राजेंना अटक करण्यापर्यंत मजल गेली होती. निष्ठावंत हंभिरराव मोहिते सारखे सरसेनापतीनि त्यांचे मनसुभे धुळीस मिळवले. अनेक शतके उलटून गेली परंतु राजे काही निर्माण झाले नाहीत परंतु देशभरात शेकडो अनाजीपंतांची पैदास मात्र जोमोने वाढली हा प्रसंग आठवण्याचे कारण 'माझं ते माझेच आणि तुझे तेही माझेच' अश्या राजकीय कुटील कारस्थानी विचारांचे विखारी दीपस्तंभ असलेले सवाई अनाजीपंत उर्फ देवेंद्र फडणीविस ह्यांनी नुकतेच छत्रपती शिवरायांचे वंशज आदरणीय,वंदनीय शिवेंद्रराजे भोसले ह्यांना लिफ्टमध्ये सन्मानाने प्रथम प्रवेश देऊन त्यांचा मान राखायला पाहिजे होता परंतु लोकशाहीचे मारेकरी,कपटी,कुटील राजकीय कारस्थानी,अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे कावेबाज आधुनिक भाजपच्या अनाजीपंतांनी अध्यक्ष रवींद्र चव्हाण विनोद तावडे दोन महिला व स्वतः लिफ्टमध्ये प्रवेश करून त्यांच्या पाठोपाठ आलेले शिवेंद्र राजे भोसले ह्यांना लिफ्टमध्ये घेऊन स्वतः बाहेर अथवा एखाद्या व्यक्तीला बाहेर काढून राजेंचा मान राखायला पाहिजे होता. परन्तु तसे न करता राजेंचे वजन जास्त झाले अशी थट्टा करून एकप्रकारे राजेंचा अवमानच केला. अन्य नेत्यांनीही राजेंना मान देऊन लिफ्ट मध्ये घ्यावे असे वाटले नाही हि किती खेदाची आणि माणुसकीला काळे फासणारी घटना आहे. एकही हंभिरराव मोहिते सारखा पाठीराखा उभा राहिला नाही हि दुःखद बाब आहे. ह्या सर्व प्रकारचा महाराष्ट्रातील जनतेने आपला राग,रोष,निषेध व्यक्त केला पाहिजे. फडणवीस ह्यांनी शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची शिवप्रेमींची मान तुकवून जाहीर माफी मागितली पाहिजे. .



