हिंदुसम्राट न्यूज
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ऊस विकास योजना कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.
कृषी विज्ञान संत अंकुश पाटील यांचे कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन.........
हिंदूसम्राट वृत्तसेवा
अध्यक्षस्थानी जवाहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे होते. ऊस उत्पादक शेतकरी समृद्ध होण्यासाठी
जवाहर कारखान्याने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान संत अंकुशपाटील म्हणाले,तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस पिकाला गरजेप्रमाणे अन्नद्रव्य,पाणी व्यवस्थापन व सेंद्रिय घटकांचा पुरवठा केल्यास जमिनीची सुपिकता वाढते. जमीन भुसभुशीत करण्यासाठी गांडूळ प्रक्रिया चालू करणे अत्यंत गरजेचे आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीझाले.यावेळी कृषी विज्ञान संत अंकुश पाटील यांचा कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, संचालक सूरज बेडगे,प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह आजी-माजी संचालक, शेतकरी उपस्थित होते. किरण कांबळे यांनी प्रास्ताविक तर सुभाष गोटखिंडे यांनी सूत्रसंचालन केले. केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे यांनी आभार मानले. हिंदूसम्राट न्यूज हुपरी



