हिंदुसम्राट न्यूज
प्रा.श्याम मानव यांच्या व्याख्यानास नांदेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद [बुआ तेथे बाया, वृक्ष तेथे छाया]
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
नांदेड-: दि.६.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन अनिस व समविचारी पक्षाच्या वतीने नांदेड येथिल कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ४ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आले होते.
भोंदू बाबा अशोक खरात याच्या सह देशातील अनेक बाबांच्या फसवणूक व महिला शोषण झालेल्या सत्य कथा त्यांनी पुराव्याणीशी आपल्या व्याख्यानात मांडल्या
महिला बाबाच्या नादी का लागतात व कश्या फसतात?, बुआ आणि ज्योतिषी महिलांना कसे फसवतात? कोणती प्रलोभने दिली जातात? शारीरिक व आर्थिक शोषण कसे होते? ढोंगी बाबांना ओळखायचे कसे? जादूटोणा विरोधी कायद्यात बाबावर कारवाई होऊ शकते काय? आदी विषयांवर प्रत्यक्ष भंडाफोड व विविध प्रकरणाचा उहापोह प्रा.मानव सरांनी केला.
व्याख्यान ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती.
उदघाट्न अनिस च्या कार्यकर्त्या सुलोचनाताई मुखेडकर यांनी केले तर माकपचे राज्य समितीचे जेष्ठ नेते कॉ.विजय गाभने यांनीही सभेला संबोधित केले.सूत्रसंचालन सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार यांनी केले.
मंचावर राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचे नेते माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे,माजी उप महापौर आंनद चव्हाण,डॉ.सचिन सरोदे,डॉ.विठ्ठल भंडारे,ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर प्रा.अनंत राऊत आदी नेतेगन उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. इरवन्त सूर्यकार, प्रा. देविदास इंगळे,दत्ता तुमवाड,प्रा.ग.ना. गोइनवाड,प्रज्ञाधर कांबळे,कॉ. लता गायकवाड,सपना टोमके,डी.एन.मोरे,बालाजी पाटोळे,कॉ.गंगाधर गायकवाड,प्रा.नरेश भिसे,बालाजी गायकवाड,ऍड. सत्यकुमार जाधव,संकेत पाटील आदींनी प्रयत्न केले.
सभागृह तुडुंब भरल्यामुळे अनेकांना खाली बसून व दरवाज्याजवळ उभे राहून व्याख्यान ऐकावे लागले.
अशी माहिती कॉ.गंगाधर गायकवाड
माकप सचिव नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.



