हिंदुसम्राट न्यूज
9/5/2026
*नेरूळ येथे पुस्तक प्रकाशन सोहळा "करपली भाकर" कथासंग्रह मान्यवरांना भेट*
हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे :
नवी मुंबई :नेरूळ येथे रंगधनु प्रकाशन व समाजभूषण उत्तमराव तरकसे सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान आंबेजोगाई यांच्या वतीने लेखक श्री गजानन म्हात्रे लिखित "आऊशी गोष्ट" आगरी बोली भाषेतील कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे मा. प्रो. डॉ. बाळासाहेब लबडे (ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक शृंगारतळी रत्नागिरी) मा सौ कौमुदी गोडबोले (साहित्यिका) मा प्रा प्रतिभा सराफ (साहित्यिका) मा नामदेवजी भगत (संस्थापक एन आर भगत शिक्षण संस्था नेरूळ नवी मुंबई) तसेच समाजभूषण मा श्री उत्तमराव दासु तरकसे असरडोहकर (महाराष्ट्र राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक कवी विचारवंत व करपली भाकरकार) यांच्या शुभ हस्ते मोठ्या जल्लोषात पार पडला,
सदर कार्यक्रमाच्या दरम्यान समाजभूषण उत्तमराव तरकसे यांचे "करपली भाकर" या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेतील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण संस्था "यशदा" व पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन विभागाच्या वतीने उत्कृष्ट साहित्य कलाकृती २०२६ च्या पुरस्काराने सन्मानित झालेला "करपली भाकर" कथासंग्रह ज्येष्ठ साहित्यिक डॉ बाळासाहेब लबडे यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,
सदर कार्यक्रमात साहित्यिक रशिक प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवल्याने सभागृह अगदीच खचून भरला होता लेखक गजानन म्हात्रे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत करत कार्यक्रमाच्या शेवटी आभार देखील मानले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.


