हिंदुसम्राट न्यूज
9/5/2026
*वानवडी-साळुंखे विहारच्या कोंडीवर उपायांसाठी लोकप्रतिनिधी-प्रशासनाची संयुक्त पाहणी*
हिंदू सम्राट पुणे प्रतिनिधी अनिल गवळी.
वानवडीची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरसेवकांची 'ऑन-स्पॉट' पाहणी कोंडीमुक्तीसाठी प्रतिनिधींकडून ठोस पावले*
पुणे, वानवडी ९ मे २०२६ – वानवडी-साळुंखे विहार प्रभागातील रस्ते व वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी आज लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यात रस्ते सुधारणा आणि वाहतूक नियोजनाबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रभागातील वाढती रहदारी आणि मुख्य चौकांमध्ये होणारी कोंडी टाळण्यासाठी कोणत्या तांत्रिक उपाययोजना करता येतील, याची सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. रस्ते दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक बदल करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक प्रशांत जगताप, माजी नगरसेवक शिवाजीराव केदारी, नगरसेवक एडवोकेट साहिल केदारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी राजेंद्र बनकर व श्री सोनावणे उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी प्रभागातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यावर भर दिला. स्थानिक प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या या पुढाकारामुळे वानवडी-साळुंखे विहार परिसरातील वाहतुकीचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा नागरिक व्यक्त करत आहेत.


