शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 28/5/2026

घोसला येथे नाला खोलीकरण व रुंदीकरण कामास १५ लाखांची मंजुरी

सौ. पुष्पाताई काळे यांच्या पाठपुराव्याला यश ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा....


हिंदूसंम्राट सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय काळे 

सोयगाव:- तालुक्यातील घोसला परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या नाला खोलीकरण व रुंदीकरण कामास जिल्हा परिषद मार्फत तब्बल १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे घोसला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.अनेक शेतजमिनींमध्ये पाणी घुसल्याने पिके वाहून गेली होती तसेच शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता.या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सौ. पुष्पाताई प्रकाश काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून घोसला येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण काम मंजूर करून घेतले. परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनीही विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशासकीय स्तरावर कामाची प्रक्रिया गतीने पूर्ण होऊन निधी मंजूर करण्यात मदत झाली.घोसला परिसरातील नाल्याची खोली कमी झाल्याने आणि रुंदी अपुरी असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. परिणामी शेतामध्ये पाणी साचून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. आता नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यात पूरस्थिती आणि पाण्यामुळे होणारे नुकसान कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.घोसला परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत सौ. पुष्पाताई काळे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांचे आभार मानले आहेत. ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या या प्रयत्नांचे परिसरात स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top