शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 28/5/2026

माथेरानच्या जंगलातील रानमेवा बाजारात.....



पत्रकार चंद्रकांत काळे रायगड माथेरान. 

महाराष्ट्र राज्य सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असणार प्रदूषण विरहित निसर्गाच्या सानिध्यातील पर्यटन स्थळ माथेरान .

हिरवीगार दाट गर्द झाडी आणि ७ .३३. चौरस स्क्वेअर किलोमीटर जंगल आणि या जंगलात एप्रिल मे या महिन्यांमध्ये माथेरानचा रानमेवा. म्हणजेच माथेरानच्या वनराईत जंगली आंबे. जांभूळ. तोरणा. अटक. अळू. करवंदी. फणसी. जंगली लिंबू. फणस. उंबर. अंजनीची फळे. हा विशेषता रानमेवा माथेरानच्या जंगलात आढळतो. आणि माथेरान जंगल परिसर कड्या कपारीत राहणारे आदिवासी म्हणजेच ठाकर समाजातील संक्षिप्त व्यावसायिक हा रानमेवा घेऊन माथेरानच्या बाजारपेठेत विकण्यासाठी येतात.  माथेरानला सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खाद्यपदार्थातील एक अनमोल व चविष्ट पदार्थ रानमेवा खाण्यास चाकाण्यास मिळतो. हा रानमेवा म्हणजे माथेरानचे जंगलातील एक अनमोल वैशिष्टच आहे. येथे पडणाऱ्या प्रथम पंधरा दिवसाच्या पावसात माथेरान येथे आलोकिक आळंबी म्हणजेच माथेरानच्या जंगलातील चविष्ट खाण्यासाठीचा पदार्थ  आळंबी जंगलात सापडते. विशेषता आयुर्वेदिक असणारी ही अळंबी म्हणजे अमूल्य पदार्थ आहे. माथेरान येथे प्रदूषण नसल्याने जंगलातील हा रानमेवा म्हणजेच केमिकल विरहित पौष्टिक व आयुर्वेदिक पदार्थ आहे. पर्यटकांच्या पसंतीचे माथेरानचे जसे आकर्षण घोडेश्वरी. हात रिक्षा.व थंड हवा. माथेरानची लाल माती.  निसर्गाच्या सानिध्यातील पर्यटकांना आकर्षित करणारे देखावे म्हणजेच पॉईंट. माथेरानचे ग्रामदैवत पिसरनाथ मंदिर. व शार्लेट तलाव.या सर्व पर्यटकांना पसंती पाडण्यास महत्त्वाच्या असून माथेरानचा निसर्ग पर्यटक आपल्या नजरेत साठवून वर्षानुवर्ष जतन करून ठेवतात व पुन्हा पुन्हा माथेरान येण्याच्या आकर्षणात असतात त्यातीलच जंगलातील राणमेवाही तितकाच महत्त्वाचा असून  एप्रिल मे या सुट्टीच्या दिवसात या हंगामात बाजारात आलेला असून पर्यटकांची पसंती या रानमेव्याला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top