शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 28/5/2026

उमेश शिंदे लिखित व आनंद शिंदे बाबा दिग्दर्शीत बापाचं स्वप्न या लघुपटाचं चित्रीकरण उत्साहात संपन्न, नवोदित.


हिंदू सम्राट प्रतिनिधी हदगाव भगवान कदम.

कलाकारांना दिली संधी. * बापाचं स्वप्न..* (मराठी लघुपट ॥ बापाच स्वप्न...।। उंचेगाव मध्ये लघुपटाचं चित्रीकरण उत्साहात संपन्न. दिपक भवर। नांदेड : उंचेगाव ता. हदगाव, जि. नांदेड येथील गावकरी कलाकारांनी साकारलेल्या "बापाचे स्वप्न" या मराठी लघुपटाचे चित्रीकरण नुकतेच उत्साहात पूर्ण झाले आहे. उमेश फिल्म्स निर्मित या लघुपटाचे लेखन उमेश शिंदे यांनी केले असून निर्मिती सहकार्य किसान दुवारे यांनी केले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन उंचेगाव नगरीचे सुपुत्र आनंद शिंदे बाबा यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडले लघुपटाचे छायाचित्रण गोविंद भोयर, पवन शिंदे आणि सत्यम जाधव यांनी केले असून स्थिरचित्रण नामदेव पावले यांनी केले आहे. प्रोडक्शनमध्ये विशाल मोरे, ऋषी कदम आणि अमर तवर यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या लघुपटात उमेश शिंदे, विशाल मोरे, अनिल शिंदे, ऋषी कदम, अमर तवर, सुदाम दरणे, नामदेव मुधळ, अतुल साबळे, तनीष्का खुपसरे, राधिका देशमुख, सागरताई शिंदे, सिद्धी शिंदे, अक्षिनी देवराये, अभय काळे, कैलास वारुळे, बालू दुवारे आणि साई कदम (बाल कलाकार) यांनी भूमिका साकारल्या आहेत. "बापाचे स्वप्न" या लघुपटाची कथा पारंपारिक कुटुंबव्यवस्थेशी संबंधित असल्याची चर्चा असून समाजाला एक सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट असेल, असे दिग्दर्शक आनंद शिंदे बाबा यांनी सांगितले. तसेच उंचेगाव खुर्द येथील समस्त गावकरी मंडळींचे विशेष सहकार्य लाभल्याचे निर्मात्यांनी नमूद केले आहे. (प्राईड नूज इंडिया)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top