शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 28/5/2026

विमा कंपनी व शासनाच्या विरोधात  सुधाकरराव देशमुख धानोरकर यांचा एल्गार; २ जूनला उमरीत 'रास्ता रोको'चा रणसंग्राम !!


उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे.

उमरी: संपूर्ण तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी होऊनही धानोरा बु.मंडळातील १८ गावांना पीक विम्यातून जाणीवपूर्वक वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विमा कंपनी आणि शासनाच्या या संगनमताने केलेल्या अन्यायाविरोधात आता शेतकरी आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. येत्या २ जून रोज मंगळवार  सकाळी ठीक ११:०० वाजता उमरी-भोकर रस्त्यावरील मामा चौकात सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य 'रास्ता रोको' आंदोलन करत थेट शासनालाच आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील कडकडीत इशारा देणारे लेखी निवेदन उमरीच्या  तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे.

विमा कंपन्यांचा 'गुढ' आक्षेप काय? शेतकऱ्यांचा सवाल

तालुक्यात सर्वत्र ओला दुष्काळ असताना केवळ धानोरा बु.मंडळातील १८ गावांवरच हा अन्याय का? असा सवाल शेतकरी करत आहेत. या संदर्भात जेव्हा शेतकरी प्रतिनिधींनी विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा *"विमा देण्यास कंपन्यांचा आक्षेप आहे"* असे उत्तर मिळाले. मात्र, हा आक्षेप नेमका काय आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रशासनाचा आणि विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांना नागवण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे.

आंदोलनाच्या रडारवर असलेली 'ही' १८ गावे:धानोरा बु. मंडळातील पुढील १८ गावांमधील शेतकरी या आंदोलनात रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणार आहेत:

धानोरा बु., बोळसा बु, बोळसा खु.वाघाळा, हिरडगाव, सोमठाणा, शिरूर, गणिपूर, बितनाळ, मोखंडी, जिरोणा, मंडाळा, रामखडक, हुंडा तांडा, हुंडा पट्टी उमरी, बोथी, तुराटी आणि सावरगाव कला.

जाब विचारणार, उत्तरांसाठी तयार राहा' थेट इशारा प्रशासनाने आणि विमा कंपनीने आंदोलनाची वेळ येऊ न देता, त्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या हिताचा तात्काळ निर्णय घेऊन या भागातील शेतकऱ्यांना हक्काचा विमा मंजूर करावा. अन्यथा २ जून रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनातून शासन व विमा कंपन्यांना जागेवरच जाब विचारला जाईल; त्याची उत्तरे देण्यासाठी त्यांनी तयार राहावे." सुधाकरराव देशमुख धानोरकर, धानोरा बु.शेतकऱ्यांना आंदोलनात उडी घेण्याचे जाहीर आवाहन विमा कंपनी आणि प्रशासनाच्या या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात धानोरा मंडळातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. सुधाकरराव देशमुख धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली २ जून रोजी होणाऱ्या या 'रास्ता रोको' आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी कोणतीही तडजोड न करता मोठ्या संख्येने आणि ताकदीने मामा चौका उमरी येथे उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक (KD the BOSS )कैलासराव देशमुख गोरठेकर व मा. सभापती शिरीषराव देशमुख गोरठेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top