शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 28/5/2026

धानोरा बु.पावसाळा सुरू होण्या अगोदर सततच्या विज खंडितने ग्रामस्थ त्रस्त!!



उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 


उमरी :-तालुक्यातील धानोरा बु.परिसरात काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, वादळ वारा झाडांच्या फांद्या तुटल्याने"इमर्जन्सी लोडशेडिंग'च्या नावाखाली ग्रामीण भागावर अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

विशेषतःरात्रीच्या वेळेस दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्यात अक्षरशः हाताने हात रुमाल हलवत रात्र काढावी लागत आहे.काही वेळेस रात्री दहा ते बारा वाजण्याच्यादरम्यान अचानक वीज बंद होत असल्याने नागरिकांच्याअडचणीत आणखी भर पडत आहे.रात्री साधारणपणे दहा वाजल्यापासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत 'इमर्जन्सी लोडशेडिंग'च्या नावाखाली

वीजपुरवठा बंद केला जात आहे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,महिला तसेच आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणकडून'ओव्हरलोड' किंवा 'तांत्रिक बिघाड'यासारखी कारणे दिली जात असली तरी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याबद्दल धानोरा बु. ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. शहरी भागात तुलनेने कमी वीज कपात- होत असताना ग्रामीण भागालाच लक्ष्य केले जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये इन्व्हर्टर किंवा पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधार आणि उकाडा या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.दिवसभरातही वारंवार

वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, व्यापारी, लघुउद्योग तसेच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतीचे नियोजन कोलमडत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची गंभीर बाबही समोर येत आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने चोरट्यांचे फावले असून घरफोडी, दुचाकी चोरी तसेच शेती उपयोगी साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून नियमित अखंड वीजपुरवठा करावा,अशी मागणी धानोरा बु.परिसरात होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top