हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 26/5/2026
परिणीता सोशल फाऊंडेशन आयोजित पाचवा परिणीता सन्मान – 2026 दणक्यात साजरा.
नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे
परिणीता सोशल फाऊंडेशन आयोजित पाचवा परिणीता सन्मान – 2026 नुकताच लिटिल वर्ल्ड मॉल खारघर नवी मुंबई येथील बॅक्वेट हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला सहप्रायोजक म्हणून पुणे येथील औटी ग्रुपचे चेअरमन मा. बाबासाहेब औटी यांचं सहकार्य लाभलं तर गिफ्टिंग पार्टनर होते अमूल, कॉ-पॉवर्ड बाय म्हणून टीआयपीएलचे मा. परेश ठाकूर अल्ट्रा लुबचे मा सिद्धेश सावंत मधुराज बिल्डर्सचे मा. मधु पाटील EPRच्या संचालिका मा. अपर्णा शाह, अड. प्रथमेश सोमण, अवधूत पिकवेल इंडस्ट्रीजचे मा स्वप्निल गुप्ते आणि जव्हार इंडस्ट्रीज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोरोना काळात व्यवसाय सुरु करणाऱ्या उद्योजिकांना सहाय्य म्हणून परिणीता सोशल फाऊंडेशन या संस्थेची निर्मिती झाली. संपूर्ण महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात परिणीता सदस्या आहेत. एकूण जोडल्या गेलेल्या सदस्यांची संख्या 50 हजाराहून अधिक आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका, चित्रपट निर्मात्या मा. अमृता राव उपस्थित होत्या. श्रीमती अमृता अरुण राव, १९७९ पासून सलग २४ वर्षे दूरदर्शनवर निवेदिका आणि वृत्त-निवेदिका म्हणून कार्यरत होत्या. ८ वर्षे एका साप्ताहिक कार्यक्रमाचेही निवेदनही त्यांनी केले. याव्यतिरिक्त, "कोर्टाची पायरी" (एक कायदेविषयक कार्यक्रम) आणि "कामगार विश्व" या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले. दूरदर्शनवरील अनेक नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला शिवाय, १९८८ पासून ६ वर्षे 'ऑल इंडिया रेडिओ'वर वृत्त-निवेदिका म्हणून काम केले. सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच, 'अमृता फिल्म्स'च्या निर्मिती अंतर्गत, विविध सामाजिक विषयांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली, त्यापैकी "श्यामची आई" या २०२३ साली आलेलया चित्रपट 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' श्रेणीतील ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला.
दुसऱ्या मुख्य अतिथी होत्या सुप्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट तज्ज्ञ मा. मानसी इंगळे मॅडम. मराठी चित्रपच मालिका नाट्यसृष्टीमध्ये आज जेवढे पुरस्कार सोहळे होतात ते मानसी यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडतात. अनेक सोहळे मानसी यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटच कंपनीने केले आहेत.
या कार्यक्रमात प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रशांत सागवेकर यांच्या संकल्पनेतून अकोलेड स्क्रीनलेडी हे मॅगझीनच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. पूर्णपणे मराठी भाषेमध्ये हे मॅगझीन असेल. स्त्री विषयाला वाहिलेले हे मॅगझीन आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेण्याच्या तयारीत उतरलं आहे. आजच्या काळात मॅगझिन, पेपर, पुस्तक याचा जमाना गेला असं म्हटलं जातं. मात्र लिखित गोष्टी सबळ पुरावे म्हणून जोपर्यंत वापरात राहतील, एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी लिखित पुराव्यांचे दाखले दिले जातील तोपर्यंत लेखर साहित्य अजरामर आहे. आजही समाजातला एक वर्ग वाचक आहे. आझही तो पुस्तकं, पेपर, साहित्य याचं नियमीत वाचन करतो. अकोलेड स्क्रीनलेडी मॅगझीन त्याच्यापर्यंत पोहोचेल असं या मॅगझिनचं सर्वेसर्वो प्रशांत सागवेकर म्हणाले. मॅगझीनला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी इंग्रजी भाषेतील नाव वापरलं आहे. प्रादेशिक बंधनात साहित्य बांधू नये एवढीच माफक अपेक्षा. पुढे जाऊन मॅगझीन इतर भाषांमध्येही सुरु होईल, स्क्रीनलेडी पुरस्कार सोहळा हा भारतात तथा भारताबाहेर आयोजित करण्याचं नियोजन आहे . विविध प्रकारचं साहित्य या मासिकात असेल. संपूर्ण मासिक स्त्री केंद्रीत असेल, लेख, मुलाखती, राजकारण, समाजकारण, आरोग्य, क्रिडा, सौंदर्य, शिक्षण, रियल इस्टेट, वैद्यकीय, शेअर मार्केट, चित्रपट, मालिका, नाटक, ओटीटी, सोशल मीडिया अशा विविध विषयावर मॅगझीन भाष्य करेल. उपस्थि मान्यवरांच्या हस्ते यावेळी स्क्रिनलेडी मॅगझिनच्या लोगोचं अनावरण पार पडलं. जून 2026 पासून हे मॅगझिन वाचकांच्या सेवेत रुजू होमारेय.
यावर्षी हा पुरस्कार अनेक मान्यवरांना देखील घोषित करण्यात आला होता ज्यात अग्रक्रमानं नाव होतं.ममता सिंधुताई सपकाळ यांचं. सुप्रसिद्ध समाजसेविका 'अनाथांची माई' सिंधुताई सपकाळ यांच्या पोटच्या कन्या ममता सपकाळ आणिकर 1973 साली सिंधुताईंना पतीने गरोदर असताना घराबाहेर काढले. त्यानंतर सिंधुताईंनी गोठ्यात ममता यांना जन्म दिला. ममता यांनी आईच्या कार्याला 'सुवर्णकळस' चढवला असे म्हटले जाते थोडक्यात, ममता सपकाळ यांनी लहानपणीची हलाखी, आईपासून दूर राहण्याचे दुःख सोसून शिक्षण घेतले आणि आज त्या स्वतः 'माई' बनून शेकडो अनाथ मुलांची सेवा करत आहेत.
त्यानंतर होत्या, ‘’प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स’च्या फाऊंडर पार्टनर डॉ. मंजिरी निरगुडकर राव ‘’प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स’ या कृषीक्षेत्रातील एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेला जन्म देणाऱ्या आणि भारतीय शेतीला विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या डॉ. मंजिरी निरगुडकर-राव विपणन (Marketing) क्षेत्रात १२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर, डॉ. मंजिरी यांना काही काळ थांबून आत्मचिंतन करण्याची गरज भासली. 'Pure Origins by Nirgudkar Farms' या व्यवसायाचा जन्म २०१९ मध्ये तीन उत्पादनांसह झाला. कोल्ड-प्रेस्ड तेल (घाण्यावर काढलेले तेल), तांदळाचे विविध प्रकार आणि गूळ. आता त्यांच्या या व्यवसायाच्या छत्राखाली ६५ हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ताजी शेतमाल उत्पादने, स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि 'खाण्यासाठी सज्ज' (Ready-to-eat) असे आरोग्यदायी पर्याय यांचा समावेश आहे. 'Pure Origins by Nirgudkar Farms' आपल्या नैसर्गिक उत्पादनांची ही अप्रतिम श्रेणी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही पोहोचवते. ज्यामध्ये अमेरिका आणि युनायटेड किंगडम (UK) येथील ग्राहकांचाही समावेश आहे.
यंदाचा परिणीता सन्मान मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि नृत्यांगना फुलवा खामकर यांनाही प्रदान करण्यात आला. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि नृत्यांगना फुलवा खामकर हिंदी आणि मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्यात प्रमुख्यानं हॅपी न्यू इयर (२०१४), जुली २ (२०१६), नटरंग (२०१०), कुणी मुलगी देता का मुलगी? (२०१२), आणि मितवा (२०१५) अशा चित्रपटांचा समावेश आहे. नटरंग या मराठी चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा झी गौरव पुरस्कार २०१० पुरस्कार त्यांना मिळाला.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमातील तारका अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनाही यावर्षीचा परिणीता सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील विनोदी भूमिकांमुळे ओळख मिळाली आहे. याबरोबरच फ्रेशर्स, दिल दोस्ती दुनियादारी आणि तु माझा सांगाती या टीव्ही शोमधून रसिका वेंगुर्लेकरांच्या भूमिका गाजल्या सोबतच रसिका वेंगुर्लेकर यांनी आपली थिएटरची आवडही जोपासली. गंगा, यमुना, सरस्वती, दिल तो बच्चा है जी, स्पिरिट आणि चेहराफेरी या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. नाटक, मालिका करता करता रसिका वेंगुर्लेकर यांना चित्रपटातही संधी मिळाली वडापाव आणि लव्ह यु जिंदगी सारख्या सिनेमांमधून त्यांनी मोठ्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला. अशा या चतुरसस्त्र अभिनेत्रीला यावर्षीचा परिणीता सन्मान जाहीर करीत आहोत
सध्या सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात महाराष्ट्रात गाजणारं नाव म्हणजे बरवा ब्युटी प्रोडक्ट या संकल्पनेच्या निर्मात्या आणि संचालिका कामाक्षी बर्वे यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'बरवा' ब्रँडची सुरुवात एका आईच्या काळजीतून झाली. कामाक्षी बर्वे सांगतात की, त्यांची 2-2.5 वर्षांची मुलगी त्यांची लिपस्टिक खेळता-खेळता दातांना लावून बसली होती. दात जांभळे-गुलाबी झालेले पाहून त्यांना प्रश्न पडला की मुलांसाठी सुरक्षित, नैसर्गिक प्रोडक्ट्स का नाहीत. तिथून 'नॅच्युरल स्किन प्रोडक्ट'चा विचार सुरू झाला. तुपापासून बनलेली लिपस्टिक - भारतात तुपापासून लिपस्टिक बनवण्याचं पेटंट अनघा दंडवते यांच्या नावावर आहे. त्यांनीही 20 वर्षांपूर्वी मुलीसाठी तूपाची लिपस्टिक बनवली होती. कामाक्षी यांनी त्यांच्याकडून परवानगी घेऊन हे प्रोडक्ट बाजारात आणलं. 100% नैसर्गिक: घरच्या पद्धतीने कढवलेलं तूप, कोकमाचं तेल आणि नैसर्गिक रंग वापरून प्रोडक्ट्स बनवली जातात. कोणतेही केमिकल वापरले जात नाही. आज 'बरवा' हा MNCs ला टक्कर देणारा मराठी कॉस्मॅटिक ब्रँड म्हणून ओळखला जातो. सेलिब्रिटींनाही या ब्रँडने भुरळ घातली असून आज कंपनीचा टर्नओव्हर कोट्यवधींचा आहे. सातार्यातून सुरू झालेला हा ब्रँड आता जागतिक बाजारपेठेत पोहोचला आहे.
उदयोन्मुख गझल गायिका डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनाही यावर्षीचा परिणीता सन्मान प्रदान करण्यात आला. गझल गायन क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकार म्हणून यावर्षी सुप्रसिद्ध गझलनवाज पं. भीमराव पांचाळे यांच्या कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे, डॉ. भाग्यश्री पांचाळे लहानपणापासूनच गझल आणि गायनाचा सराव करत आहेत. गझलनवाज पं. भीमराव पांचाळे यांच्यासोबत त्यांनी अनेक ठिकाणी 'स्नेह गझल', 'शब्द सुरांची भावयात्रा' अशा मैफिली सादर केल्या आहेत. "आसवांचे जरी हसे झाले" ही गझल सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. डॉ. भाग्यश्री पांचाळे वडिलांचा गझल वारसा पुढे नेत असून स्वतः पीएचडी प्राप्त गझल गायिका आहेत
The Ayurvedic T.H.Y.R.O.I.D. Clinic च्या संस्थापिका डॉ. सुषमा पाटील यांनाही यावर्षीचा परिणीता सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. सुषमा पाटील या पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ असून The Ayurvedic T.H.Y.R.O.I.D. Clinic च्या संस्थापिका आहेत. आयुर्वेद क्षेत्रात 11+ वर्षांचा अनुभव आहे. The Ayurvedic T.H.Y.R.O.I.D. Clinic मध्ये कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत. थायरॉईड: हायपर / हायपो - थायरॉईडिज्म यावर त्या प्राधान्याने उपचार करतात तसेच आर्थरायटिस मॅनेजमेंट, डायबेटिस मॅनेजमेंट, गॅस्ट्रायटिस ट्रीटमेंट, हायपरटेन्शन ट्रीटमेंट, ओबेसिटी ट्रीटमेंट या आजारांवरही त्यांचे उपचार रामबाण आहेत. पंचकर्म, आयुर्वेदिक सर्जरी असे उपचारही त्या करतात. Institute of Ayurveda and Integrative Medicine च्या सदस्या आहेत डॉ. सुषमा पाटील आणि त्यांचे पती प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. विक्रांत पाटील यांच्या उपचारांनी अनेक आजारातील रुग्णांना नव संजीवनी मिळाली आहे.
अमृत फूड प्रोडक्ट, अहिल्यानगरच्या संचालिका मीरा बेरड यांनाही यावर्षीचा परिणीता सन्मान प्रदान करण्यात आला.
अहिल्यानगर सारख्या शहरात स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून स्वत:चा अमृत फूड प्रोडक्ट्सच्या नावाचा ब्रॅण्ड तयार करणाऱ्या मीरा बाळासाहेब बेरड सौ. मीरा बाळासाहेब बेरड या नगर तालुक्यातील दरेवाडी गावच्या आहेत. स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समुहातून गेल्या पाच वर्षांपासून त्या अमृत फूड प्रोडक्ट्स नावाचा एक गृहोद्योग चालवतात. या व्यवसायामुळे आज अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. तसेच अनेक महिलांना मार्गदर्शन देखील त्या करत असतात. आज हे पदार्थ फक्त अहमदनगर किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशात पाठवले जातात.
पनवेल येथील कॉम्सॅटोलॉजिस्ट डॉ. निवेदिता मोरे यांनाही यावर्षीचा परिणीता सन्मान प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. निवेदिता मोरे, निवेदिता निलेश मोरे या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित कॉस्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, मेकअप व हेअर आर्टिस्ट, PMU तज्ज्ञ आणि 'क्राउन केअर एस्थेटिक क्लिनिक, सलून अँड ॲकॅडमी'ची संस्थापिका आहेत.
मेकअप आणि प्रगत सौंदर्य उपचारांच्या क्षेत्रातील २२ हून अधिक वर्षांच्या अनुभवासह, सौंदर्य आणि स्वास्थ्याद्वारे लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांचे जीवन आमूलाग्र बदलण्यासाठी त्यांनी हा प्रवास समर्पित केला आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजिका रेश्मा कुरुप यांनाही यावर्षीच्या परिणीता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. विविध शालोपयोगी साहित्यांचं वाटप, विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करणं अशा अनेक उपक्रमांमध्ये त्या सातत्यानो सहभागी असतात. शासनाच्या योजना ग्रामस्थापर्यत पोहोचवण्यासाठीही त्या सतत प्रयत्नशील असतात. समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेतून रेश्मा यांचं कार्य खरोखर कौतुकास्पद म्हणावं लागेल,
रितिका किचन, पनवेलच्या संचालिका रितिका गायकवाड यांनाही परिणीता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पनवेल येथील रितिका किचन डेझर्ट कॅफेच्या संचालिका रितिका गायकवाड 2020 मध्ये एका छोट्या घरातून सुरू झालेला रितिका किचनचा प्रवास आज एका यशस्वी डेझर्ट कॅफेपर्यंत येऊन पोहोचला आहे. घर आणि मुलीची जबाबदारी सांभाळत, रितिका गायकवाड यांनी केवळ आपल्या हाताच्या चवीवर आणि जिद्दीवर शून्यातून हे विश्व उभे केले. २०२५ साली अथक परिश्रमानंतर स्वतःच्या हक्काच्या 'डेझर्ट कॅफे'ची स्थापना त्यांनी केली. १००% शुद्धता, हायजीन आणि 'बेस्ट क्वालिटी' हे त्यांच्या डेझर्ट्सची खास वैशिष्ट्य आहेत. रितिका किचन हे केवळ नाव नसून, एका स्त्रीच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे प्रतीक आहे.
हायकोर्ट वकील अड. संतोषी चव्हाण यांनाही यावर्षीच्या परिणीता सन्मान पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं ॲड. संतोषी कल्पेश चव्हाण या नवी मुंबई परिसरातील प्रतिष्ठित हायकोर्ट वकील तसेच समाजाभिमुख सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मागील 10 वर्षांपासून त्या कायदा क्षेत्रात आणि मागील 20 वर्षांपासून सामाजिक सेवेत समर्पितपणे कार्यरत असून कुटुंब व्यवस्थापन, कौटुंबिक समुपदेशन आणि महिलांच्या सक्षमीकरणात त्यांचे विशेष योगदान आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्या बचत गटांच्या माध्यमातून गेली 20 वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. वकील म्हणून त्या गरजू व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय असून त्यांच्या कार्यातून “आदर्श कुटुंब, आदर्श समाज आणि सशक्त राष्ट्र” या संकल्पनेला बळ मिळते. त्यामुळे अनेक संघटनानी त्यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेले आहे.
प्रसिद्ध ग्राफिक्स डिझायनर सुचेता अराणके यांनाही यावर्षीच्या परिणीता सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
सुचेता अराणके यांनी ललित कला (व्यावसायिक) मध्ये पदवी घेतली आणि एका जाहिरात एजन्सीमध्ये दशकभर काम केले, त्यानंतर त्यांनी स्वतःचा ब्रँड 'ओपस क्रिएशन्स' सुरू केला. ज्याअंतर्गत ब्रँडिंग सोल्यूशन्स, ग्राफिक डिझायनिंग, हाताने रंगवलेली पारंपरिक भारतीय चित्रे आणि समकालीन कला फ्रेम्स तसेच कला आणि चित्रकला वर्ग आणि कार्यशाळा अशा सेवा पुरवल्या जातात सुचेता अराणके यांच्या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे मागणीनुसार तयार केलेले, सानुकूलित आणि वैयक्तिकृत सोल्यूशन्स हे होय.
रायगडमधील उद्योजिका वृषाली पाटील यांचाही परिणीता सन्मान पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.
सौंदर्यशास्त्र कला अंतर्गत प्रशिक्षण वर्ग, सामाजिक क्षेत्र तथा उद्योजिका वृषाली राजेंद्र पाटील,
सौ. वृषाली राजेंद्र पाटील यांनी सौंदर्यशास्त्र कला अंतर्गत प्रशिक्षण वर्ग, सामाजिक कार्य, तथा उद्योजिका म्हणून रायगड जिल्ह्यात नावलौकिक मिळवला. संस्कार बचत गट पनवेलच्या त्या अध्यक्षा आहेत. Inner wheel club of panvel city मध्ये त्या कार्यरत असतात त्याअंतर्गत अनाथ आश्रमात मोफत मेकअप प्रशिक्षण सुद्धा त्यांनी दिलं आहे. तसेच रायगड जिल्ह्यात आयोजित अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
नवी मुंबईतील प्रसिद्ध योग प्रशिक्षिका शिल्पा कटरनवरे यांनाही परिणीता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
योगा प्रशिक्षणातून स्त्रीयांना निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली सांगणाऱ्या नवी मुंबईतील प्रसिद्ध वैद्यकीय योग प्रशिक्षक शिल्पा कटरनवरे, योगा प्रशिक्षणात डिप्लोमा केलेल्या शिल्पा यांनी मेडिकल योगा थेरपिस्ट म्हणून काम सुरु केले. अगदी सर्वसामान्य घरातली ही गृहिणी पाहता पाहता उत्कृष्ट योग प्रशिक्षक झाली. पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, नेरुळ अशा भागातून त्यांच्याकडे प्रशिक्षणार्थी येऊ लागले. निरोगी आयुष्यासाठी योगा त्या शिकवतात. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या गृहिणींची संख्या मोठी आहे.
तसेच बॅंकर श्रीमती नमिता अभिजीत लोखंडे यांनाही परिणीता सन्मान पुरस्करानं सन्मानीत करण्यात आलं २०१३ रोजी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून रुजू झाल्या त्या आज व्यवस्थापक असून उरण शाखेत कार्यरत आहेत. सामान्य बँकिंगच्या ठेव विभागाचे काम त्या पाहतात. ज्यामध्ये सर्व ठेवविषयक कामे, दावे आणि इतर अनेक बाबींचा समावेश आहे. सामान्य बँकिंगच्या ग्राहकांसाठी कठोर परिश्रम घेणे, लोकांना त्यांच्या दाव्यांशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यास मदत करणे, मृत व्यक्तींच्या कठीण दाव्यांचे निराकरण करणे अशी कामं त्या आवडीनं करतात ग्राहक सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून, त्यांनी संस्थेसाठी अनेक उद्दिष्टे साध्य केली आहेत. त्यांना लिहिण्याचा छंद आहे. मी सह-लेखिका म्हणून ११ पुस्तके संकलित केली आहेत. सामाजिक कार्यांमध्येही त्यांचा मोठा सहभागी असतो.






