शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 22/5/2026

हदगांव शहरांतील पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.



प्रतिनिधी हिंदू सम्राट हदगाव भगवान कदम


गुरुवर्य राजकीय सामाजिक क्षेत्रासह भक्त मंडळीची उपस्थिती

  हदगांव शहरांतील हदगांव महादेव मंदिराचे गुरुवर्य शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हदगांव शहरात  मंगळवार एकोणीस मे ते एकेवीस मे तिन दिवस अधिक मासानिमीत्य पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त दररोज सकाळी   श्री शिवयोगी बसवलिंग महास्वामीजी यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक ,   शिवपाठ , विश्वशांती रुद्रयाग स्वाहाकार ,नंतर  श्री.महादेव मंदिर ते कार्यक्रम स्थळ हदगांव शहरांतील कस्तुरी मंगल कार्यालय  रुद्रकलश मिरवणूक सपन्न झाली. त्यानंतर  ग्रंथराज परमरहस्य  पारायण व महाप्रसाद संपन्न झाला.

गुरुवार एकेवीस मे रोजी उज्जैन नगरीतील श्रीमद जगदगुरु श्री. श्री.श्री. सिध्दलिंग राजदेशिकेद्रं शिवाचार्य महास्वामीजीचे जल्लोषात मिरवणूकीने हत्तीवरुन मिरवणूकीने स्वागत करण्यात आले. यावेळेस वेदांताचार्य शिवाचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा , महंत गोपाल गिर महाराज, गुरु बाल व्यकटस्वामी महाराज पिंपळगाव , गुरु दिगांबर शिवाचार्य महाराज  वसमत, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज चिल्लरगी,  रुद्रमणी शिवाचार्य महाराज मुदखेड, भंदत दयानंद महाथेरु मेळावा,गुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज देवणी, गुरु प्रभुलिंग शिवाचार्य महाराज शिरड शहापुर , गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी ,प.पु योगीराज  महाराज हदगांव , विरागोदासजी महाराज शिवपुरी, गुरु गंगेश्वर महाराज, गुरु मुक्तीनाथ महाराज, गुरु माहेश्वरी टाकराळा, गुरु गजानन महाराज आर्णी, गुरु मन्ना महाराज  नांदेड,  गुरु लक्ष्मण महाराज  हंगरगेकर गुरु बंडु बाबा वांरगा महानुभाव पंथासह आजुबाजुच्या जिल्ह्यातील गुरुवर्याच्या उपस्थितीत शहरातुन मिरवणूकीनंतर  धर्मसभेत गुरुवर्यानी आपापले विचार व्यक्त करीत  शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले.या सोहळ्यानिमीत्य आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महादेव मंदिराला तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्तीसह विविध कार्यासाठी  आवश्यक सभागृहासह मंगल कार्यालयास  निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या सोहळ्यानिमीत्य नांदेड  माजी महापौर शैलेजा किशोर स्वामी, उमरखेड आमदार किशनराव वानखेडे , नगराध्यक्षा रोहिणीताई भास्कर वानखेडे निधीताई नितीन भुतडा उमरखेड कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मंडळीची उपस्थिती लावली.  महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी हदगांव तालुक्यासह परीसरातील तालुक्यातील  भक्त सेवेकरी  मंडळीनी  परीश्रम घेतले. प्रास्ताविक शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. सुत्रसंचलन संदेश चोंढेकर, प्राध्यापक डाॅ.साईनाथ चंदापुरे यांनी केले तर आभार श्रीकृष्ण मंदिराचे गुरुवर्य योगीराज महाराज  यांनी केले.



सोहळ्यातील आकर्षण 

अधिक मासानिमीत्य  आयोजित सोहळ्यानिमीत्य  उज्जैन नगरीतील जगदगुरु व  गुरुवर्यासह  मंहताचे एकाच ठिकाणी दर्शन यानिमित्त  राजकीय सामाजिक धार्मिक विविध क्षेत्रासह मोठ्या संख्येतील भक्त मंडळीची मोठ्या संख्येतील  उपस्थिती गुरुवर्याची हत्तीवरुन मिरवणूक सोहळ्यातील  नियोजन आकर्षण दिसले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top