शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :-22/5/2026

आवळी बुद्रुक येथील तरुणाचा भोगावती नदीत मासेमारीसाठी गेला असता तोल जाऊन नदीत पडल्याने मृत्यू.



दैनिक हिंदूसम्राट शिरगाव प्रतिनिधी पांडुरंग पोवार. 


 राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथील भोगावती नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेला असता तरुणाचा तेथील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रेम सतीश बागडी (वय २३) असे या युवकाचे नाव असून बुधवारी सायंकाळपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता. मात्र गुरुवारी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात आली दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला आहे .


मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम हा बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गावाजवळील नवीन पुलाशेजारी भोगावती नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि वाहत्या प्रवाहात बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या दहा वर्षांच्या चुलत भावाने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत प्रेम पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला होता.


घटनेची माहिती मिळताच नदी परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक तरुणांनी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवली, मात्र पाण्याचा वेगवान प्रवाह आणि अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली . यावेळी त्याचा मृतदेह हाती लागला .


 प्रेमचा बुधवारी बी.सी.ए. पदवीचा निकाल लागला होता आणि तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. . त्याच्यावर या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असताना दुर्दैवी घटना घडली. त्यात त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने आनंदाचे वातावरण होते . मात्र या घटनेने घरावर दुःखाचे सावट पसरले. 


प्रेमचे वडील सतीश बागडी हे नोकरीनिमित्त अनेक वर्षांपासून कुरुंदवाड येथे वास्तव्यास आहेत. कौटुंबिक कारणामुळे ते गावी आले असताना ही घटना घडली. प्रेम हा घरातील एकुलता एक मुलगा असून अभ्यासात हुशार, शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे गावात सर्वांचा लाडका होता. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणार होता . या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झालेली असून पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस अधिक तपास करत आहेत .

    

दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनशी संपर्क साधला टीम प्रमुख कृष्णा सोरटे म्हणाले की ,आम्ही वाकरे तालुका करवीर व राधानगरी तालुक्यातील काळमावाडी आणि आवळी बुद्रुक मधील प्रेम बागडी या तिघांचे मृतदेह आज एकाच दिवशी नदीतून काढून आलेलो आहोत. आवळी मधील प्रेत हे बुधवार दुपार ते गुरुवारी दुपारी 1.30वा. म्हणजेच 21 तासाच्या कालावधीनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने टीम प्रमुख कृष्णात सोरटे, प्रथमेश येरुडकर, शुभम म्हाडगुत , शैलेश हांडे, प्रीतम केसरकर,रोहित जाधव ,रोहन चौगले, अविनाश बलुगडे ,अक्षय पवार ,अमर पाटील , आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले,साहिल कोळी, सुदेश चव्हाण व श्रीधर बागडी यांनी प्रेत शोधण्यासाठी आवळी बुद्रुक नवीन पूल ते शिरगाव पुलापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाने शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रेत हाती न लागल्यामुळे ते परत आवळी बुद्रुक या पुलापर्यंत येऊन थांबले असता पुलावरील काही लोकांनी साधारणतः एक 

1 वाजून 30 मिनिटांनी प्रेत पाण्यावर तरंगायला लागले त्यावेळी ते प्रेत दिसले. व जिल्हा पती व्यवस्थापनाने बाहेर प्रेत आणले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top