शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 22/5/2026

तळेगाव देशमुख कुटुंबांनी वडिलोपार्जित जमीनीतुन रस्ता करण्यास प्रशासनाला परवानगी दिल्याने शेतकऱी आनंदी!!



उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे.


उमरी तालुक्यातील तळेगाव येथे दि.२०मे रोजी देशमुख कुटुंबीय सर्व सदस्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमीनीतुन रस्ता शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता प्रशासनाला परवानगी दिली आहे.

गेली अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता रस्ता नव्हता म्हणून देशमुख कुटुंबीय वडिलोपार्जित आपल्या मालकी हक्क जमिनीतून रस्ता करण्यासाठी दिली आहे.

सदर,उमरी तालुक्यातील मौजे तळेगावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून

रखडलेला होता. संबंधित यंत्रणा यांच्या व तालुका प्रशासन यांना सदरचा रस्ता हा दि. २० मे रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे ताब्यात देऊन कामास सुरुवात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

अनेक वर्षापासून रखडलेला

रस्ता मोकळा करून जिल्हा

परिषद बांधकाम विभाग यांचे

ताब्यात देण्यात आला. यावेळी

तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत,नायब तहसीलदार संजय सोलंकर,पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुटे,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम

विभाग भोकर गायकवाड,

उपविभागीय अभियंता जिल्हा

परिषद बांधकाम विभाग भोकर

शिंदे, गटविकास अधिकारी सतीश मांजरमकर यांची उपस्थिती होती.




त्याचप्रमाणे व्हीपीके समूहाचे चेअरमेन मारोतराव कवळे, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी,मंडळ अधिकारी तळेगाव रामेश्वर भिंगोरे, ग्राम महसूल अधिकारी बालचंद कदम, प्रभू खानसोळे,

ग्रामपंचायत अधिकारी श्रीरामवार,महसूल सहाय्यक दीपक दराडे,सरपंच प्रतिनिधी मोहनराव देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वर्ग शेतकरी बहुसंख्य उपस्थित होते.

तळेगाव येथील शेतकऱ्यांनी रखडलेला रस्ता होत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top