शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 15/6/2026

शिवणकामगार संतोष राऊलवार यांच्या निधनानंतर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतली सांत्वनपर भेट.




 तालुका प्रतिनिधी भगवान कदम

वडगांव (बु.) येथील रहिवासी आणि प्रसिद्ध शिवणकामगार संतोष राऊलवार यांचे ४ एप्रिल रोजी  मोटारसायकलच्या भीषण अपघातात अकाली निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राऊलवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात सहभागी होत, हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

      ​संतोष राऊलवार हे आपल्या मनमिळावू स्वभावासाठी आणि उत्कृष्ट शिवणकामासाठी तामसा परिसरात परिचित होते. ४ एप्रिल रोजी झालेल्या मोटारसायकल अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या निधनाने राऊलवार कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ​घटनेची माहिती मिळताच आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी संतोष राऊलवार यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थित कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. संतोष राऊलवार यांच्या जाण्याने एका कष्टकरी तरुणाला आपण मुकलो आहोत. या कठीण काळात आम्ही राऊलवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अशा भावना आमदार कोहळीकर यावेळी व्यक्त केल्या. ​यावेळी माजी उपसभापती बाबूसराव कदम रुईकर, शिवसेना समन्वयक केशवराव हरण, तामसा ग्रामपंचायत सदस्य सुभाष धरमुरे, तामसा विभागप्रमुख संतोष ठमके, शिवसेना (उबाठा)नेते अशोक फाळके, कार्यकर्ते ज्ञानेश्वर विभुते, छगन हरण, पत्रकार संजय राऊलवार, अर्जुन जोशी, शिवम राऊलवार उपस्थित होते. राऊलवार कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही आमदार कोहळीकर यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top