हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 15/5/2026
विकासकामांच्या मूल्यांकन तपासणीत केवळ कागदी घोडे ?
@अंगणवाडी व शाळेच्या दप्तर तपासणीतच वेळ गेला; रात्री उशिरा अवघ्या एका तासात गुंडाळला दौरा..
@ पंचायत समितीचा भोंगळ कारभार उघड पडू नये म्हणून.. मूल्यांकन पथकात 50*50 अधिकारी
तालुका प्रतिनिधी भगवान कदम.
हदगाव तालुक्यातील नाव्हा ग्रामपंचायतीत विकासकामांच्या मूल्यांकन तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या कामकाजावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या विविध विकास योजनांची प्रत्यक्ष पाहणी, कामांची गुणवत्ता आणि निधीचा उपयोग तपासण्याऐवजी केवळ अंगणवाडी व शाळेच्या दप्तरांची औपचारिक तपासणी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे मूल्यांकन सुरू असून त्यासाठी तालुकास्तरावर विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नाव्हा येथे आलेल्या पथकाने दिवसभर येवली, पिंपळगाव मूल्यांकन तपासणी करून रात्री वेट अँड वॉच भूमिकेत बसलेले नागरिकांनी 9 वाजेपर्यंत वाटपाहीली.कोणतीही ठोस प्रत्यक्ष विकासकामांची पाहणी केली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील रस्ते, नाली, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक बांधकामे, महिला व बालकल्याण उपक्रम, ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेली विकासकामे याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.
विशेष म्हणजे रात्री उशिरा गावात पोहोचलेल्या पथकाने अवघ्या एका तासात कागदपत्रांची तपासणी पूर्ण करून दौरा आटोपल्याचे सांगितले जात आहे. शाळा व अंगणवाडीतील दप्तर तपासणीपुरतेच संपूर्ण मूल्यांकन मर्यादित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “प्रत्यक्ष विकासकामांची पाहणी न करता केवळ कागदपत्रांवर गुण देण्यात येत असतील, तर अशा तपासणीचा फायदा काय?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जाहीर होत असताना मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोर असणे आवश्यक आहे. मात्र नाव्हा येथील तपासणीवरून ही प्रक्रिया केवळ औपचारिकतेपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर चे गटविकास अधिकारी अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मूल्यांकन तपासणी पथकात तालुक्यातील एक गटविकास अधिकारी दोन विस्तार अधिकारी असल्यामुळे तालुक्यातील पंचायत समितीच्या काय निकष देणार की मॅनेजमेंट होणार ?


