शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 15/5/2026

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परिणीता सन्मान 2026.

नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे 

परिणीता सोशल फाऊंडेशन आयोजित पाचवा परिणीता सन्मान सोहळा शनिवार, दि. 16 मे 2026 रोजी सायंकाळी लिटिल वर्ल्ड मॉल, खारघर, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शिका व निर्मात्या अमृता राव या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच इव्हेंट मॅनेजमेंट तज्ज्ञ मानसी इंगळे या प्रमुख पाहुण्या असतील. सुप्रसिद्ध टीव्ही अँकर, लेखिका व सूत्रसंचालिका डॉ. मृण्मयी भजक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

या सोहळ्यास पुण्यातील सुप्रसिद्ध औटी ग्रुपचे संचालक बाबासाहेब लक्ष्मण औटी, टीआयपीएलचे संचालक परेश ठाकूर, अल्ट्रा लूबचे संचालक सिद्धेश सावंत, अवधून पॅकवेल इंडस्ट्रीजचे संचालक स्वप्निल गुप्ते, पनवेलचे नगरसेवक प्रथमेश सोमण तसेच रायगडमधील प्रसिद्ध बिल्डर मधुराज बिल्डर्सचे मधु पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

यावर्षी जगप्रसिद्ध ब्रँड अमूल प्रथमच परिणीता सन्मान सोहळ्यासोबत जोडला गेला असून प्रमुख अतिथींना अमूलचे गिफ्ट हॅम्पर्स देण्यात येणार आहेत.

यंदाचे सेलिब्रिटी पुरस्कार परिणीता सोशल फाऊंडेशनने सखोल रिसर्चद्वारे घोषित केले आहेत. स्वतः पुढाकार घेऊन मान्यवर महिलांशी संपर्क साधत त्यांच्या कार्याची माहिती घेऊन हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात सुप्रसिद्ध समाजसेविका ममता सिंधुताई, प्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर, विनोदी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, बरवा कॉस्मेटिकच्या संचालिका कामाक्षी बर्वे, निरगुडकर फार्म्सच्या संचालिका मंजिरी निरगुडकर राव, रायगड जिल्ह्याच्या डीवायएसपी माया मोरे, उदयोन्मुख गझल गायिका डॉ. भाग्यश्री पांचाळे तसेच सुप्रसिद्ध शेफ आरती निजापकर यांचा समावेश आहे.

परिणीता सन्मानासाठी यावर्षी राज्यभरातून 150 हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्यातून निवडक महिलांची प्रत्यक्ष पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुषमा पाटील, अमृत फूड प्रोडक्ट, अहिल्यानगरच्या संचालिका मीरा बेरड, कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. निवेदिता मोरे, उद्योजिका रेश्मा कुरुप, रितिका किचन, पनवेलच्या संचालिका रितिका गायकवाड, हायकोर्टच्या वकील अॅड. संतोषी चव्हाण, ग्राफिक्स डिझायनर सुचेता अराणके, उद्योजिका वृषाली पाटील, योग प्रशिक्षिका शिल्पा कटरनवरे तसेच बँकर नमिता लोखंडे यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला राज्यभरातील सर्व परिणीता सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉचे आयोजन असून विजेत्यांना मिक्सर, इस्त्री, ग्लाससेट व साडी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या एक तास आधी प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार आहे.

पासेससाठी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संचालिका साक्षी प्रशांत सागवेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top