शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 12/5/2026

माले-मुडशिंगीत ७० बांधकाम कामगारांना सुरक्षा संचांचे वाटप

असंघटित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचा कामगारांसाठी उपक्रम.


I

कोल्हापूर-हिंदूसम्राट वृत्तसेवा.

माले-मुडशिंगी येथे असंघटित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेतर्फे ७० कामगारांना सुरक्षा संच वाटप

माले-मुडशिंगी येथे असंघटित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील ७० कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच तसेच गृहउपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. कामगारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.



कार्यक्रमात कामगारांना हेल्मेट, हातमोजे, सेफ्टी साहित्य आदींचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या उपक्रमामुळे उपस्थित कामगारांनी समाधान व्यक्त करत संघटनेचे आभार मानले. कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कामगार व नागरिकांची उपस्थिती होती.

वाटपप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुहास साका, माले ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, फारूक सय्यद तसेच संघटनेच्या व्यवस्थापिका प्रतीक्षा साका उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top