शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 11/5/2026

*नांदेड जिल्ह्यातून बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना*




*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*


नांदेड :- दि.१०.जिल्यातील अर्धांपूर तालुक्या मधील लोणी(खु )येथील विवाहित नववधूने स्वतःच्याच चुलत भावाच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून एका २१ वर्षीय नवविवाहितेने विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची ला उसळली आहे.विहीर

​नांदेड हादरलं! भावाच्या छळाला कंटाळून २१ वर्षीय ऋतुजाचा विहिरीत उडी मारून शेवट आरोपीवर गुन्हा दाखल

​नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. 


ऋतुजा सुधीर लोणे असे मृत विवाहितेचे नाव असून, अवघ्या २१ व्या वर्षी तिने टोकाचे पाऊल उचलले.तिचा नुकताच विवाह झाला होpता, मात्र नात्याने भाऊ लागणाऱ्या प्रफुल लोणे याच्या विकृत नजरेमुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला.

​सततच्या धमक्या आरोपी प्रफुल सुनील लोणे हा ऋतुजाला "तू मला आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीस तर तुझा संसार मोडून टाकेन," अशी धमकी देऊन तिचा मानसिक छळ करत होता.


 या सर्व प्रकाराची कुणकुण नातेवाईकांना लागल्यावर आपल्या चारित्र्यावर संशय घेतला जाईल आणि समाजात बदनामी होईल,या भयापोटी ऋतुजा प्रचंड मानसिक दबावाखाली होती. 


​विहिरीत उडी घेऊन शेवट: या तणावातून तिने गावातील एका विहिरीत उडी घेऊन स्वतःला संपवले.बराच वेळ शोध घेतल्यावर तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला.मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलिसांनी आरोपी प्रफुल लोणे याच्यावर 'आत्महत्येस प्रवृत्त' केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top