शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 11/5/2026

माजी सैनिक राजेंद्र चौगुले यांना “सैनिक रत्न” पुरस्कार जाहीर.



हिंदूसम्राट प्रतिनीधी - उत्तम हेलाटे आप्पाचीवाडी


कुरली (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील माजी सैनिक राजेंद्र महादेव चौगुले यांना महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनतर्फे प्रतिष्ठेचा “सैनिक रत्न” पुरस्कार जाहीर झाला आहे. चौगुले हे माजी सैनिक असून कुरली येथील आजी-माजी सैनिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.

समाजकार्याची विशेष आवड असलेल्या चौगुले यांनी सैन्य सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासह त्यांच्या कुटुंबांना विमा लाभ मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तसेच सैन्य भरती झालेल्या जवानांना कॉल लेटर प्राप्त होताच तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याची अभिनव सुविधा त्यांनी आपल्या बँकेमार्फत सुरू केली आहे.सहकार क्षेत्रातूनही त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत.त्यांच्या पारदर्शक व कार्यक्षम कारभारामुळे सैनिक बँकेने अवघ्या १९ महिन्यांत सात कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून पाच कोटी रुपयांहून अधिक कर्जवाटप केले आहे.मार्च २०२६ अखेर कर्जावरील व्याजाची शंभर टक्के वसुली करण्यात बँकेला यश आले आहे.त्यामुळे बँकेच्या नावलौकिकातही मोठी भर पडली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनने त्यांना “सैनिक रत्न” पुरस्कार जाहीर केला आहे. परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top